ओमान आणि मुंबई यांच्यात मस्कत येथे तीन टी२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मुंबईने ओमानवर १८ धावांनी विजय मिळवला. मुंबईच्या संघाचा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. शानदार अर्धशतक झळकावणार्या जयस्वालला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. दुसऱ्या सामन्यातील विजयासोबतच मुंबईने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
जयस्वालची धमाकेदार खेळी
सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ओमानसमोर १६२ धावांचे आव्हान उभे केले होते. सलामीवीर यशस्वी जयस्वालने ५९ चेंडूत ७५ धावा चोपल्या. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत ओमानचा संघ १४४ धावांवर सर्वबाद झाला. ओमानच्या संघासाठी खेळणाऱ्या जितेंद्र सिंग याने फलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत २५ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने ५९ धावा काढल्या. त्याच्या खेळीनंतरही ओमानला सामना जिंकता आला नाही. मुंबईच्या अष्टपैलू शम्स मुलानीने सामन्यात तीन बळी आपल्या नावावर केले.
ओमान दौऱ्यावर आहे मुंबईचा संघ
आगामी टी२० विश्वचषकातील सामने यूएईसोबत ओमानमध्येही खेळवले जाणार आहेत. ओमानचा संघ यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकात सहभागी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ओमानचा संघ तयारी करतोय. मुंबईसोबतचे हे सामनेही या तयारीचा एक भाग म्हणून आयोजित केले गेले आहेत. ओमान आणि मुंबई यांच्यात तीन टी२० आणि तीन वनडे सामन्यांचे आयोजन केले गेले आहे. मुंबईचा हा दौरा २ सप्टेंबरला संपेल.
टी२० मालिकेतील पहिला सामना २४ ऑगस्टला खेळला गेलेला. त्या सामन्यात ओमानने विजय मिळवला होता. या मालिकेनंतर २९, ३१ ऑगस्ट आणि २ सप्टेंबरला या दोन संघात वनडे मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्यानंतर यशस्वी जयस्वाल व शिवम दुबे आयपीएलसाठी राजस्थान राॅयल्स संघात सामील होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मुंबई इंडियन्स साधणार विजेतेपदाची हॅट्रिक, भारतही जिंकेल टी२० विश्वचषक’, हार्दिक पंड्याचा विश्वास
केविन पीटरसनला भविष्यवाणी पडली महागात, वसीम जाफरने घेतली ‘अशी’ फिरकी
सीएसकेच्या प्रशिक्षण सत्रात धोनी दिसला नव्या भूमिकेत, दीपक चाहरने जिंकला मजेदार गेम