इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या सुरु असलेल्या 2019 आयसीसी विश्वचषकाच्या विजेतेपदाची ट्रॉफी 14 जूलैला उचलण्याची इच्छा भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने व्यक्त केली आहे. 14 जूलैला या विश्वचषकातील अंतिम सामना पार पडणार आहे.
पंड्याने आयसीसीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या विश्वचषकाबद्दलच्या त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्याने भारतासाठी खेळणे हे त्याचे सर्वस्व असल्याचेही म्हटले आहे.
पंड्या म्हणाला, ‘भारतासाठी खेळणे माझ्यासाठी सर्वकाही आहे, हे माझे जीवन आहे. मी हा खेळ प्रेमाने आणि जिद्दीने खेळतो. मला आव्हाने स्विकारायला आवडतात. मी 2-3 वर्षांपासून या विश्वचषकाची तयारी करत आहे. आता ती वेळ आली आहे.’
त्याचबरोबर 2011 ला भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनची आठवणही यावेळी हार्दिकने सांगितली आहे. त्याने सांगितले, ‘काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने मला एक फोटो पाठवला होता आणि विचारले होते ‘तूला हे आठवते का’, यावर मी नक्कीच असे सांगितले होते.’
‘त्याने आम्ही भारतीय संघाने 2011 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर करत असलेल्या सेलिब्रशनचा फोटो काढला होता आणि आम्ही रस्त्यावर होतो. कारण हे एखाद्या सणासारखे होते. एका रात्री एवढे लोक बाहेर आलेले मी पाहिले नव्हते. खरंतर त्या गोष्टीने मला भावनिक केले.’
पुढे हार्दिक म्हणाला, ’14 जूलैला मला विश्वचषक माझ्या हातात हवा आहे. मी जेव्हा 2011 च्या विश्वचषकाचा विचार करतो तेव्हा अजूनही माझ्या अंगावर काटे उभे राहतात. आठ वर्षांनी 2019 चा विश्वचषक मी खेळत आहे. हे माझे स्वप्न होते. माझे संघसहकारी माझ्या भावांसारखे आहेत. विश्वचषक जिंका, अशी माझी आत्ता साधी योजना आहे आणि मला त्याची आपेक्षा आहे. मला माझ्याकडून हे अपेक्षित आहे.’
शेवटी हार्दिकला त्याच्यावर असणाऱ्या चांगल्या कामगिरी करण्याच्या दबावाबद्दल विचारले असता त्याने गमतीने उत्तर दिले की ‘कोणताही दबाव नाही. कारण कदाचीत फक्त 150 कोटी लोकांच्या आपेक्षा आहेत. त्यामुळे कोणताही दबाव नाही.’
तसेच या मुलाखती दरम्यान हार्दिकने असेही सांगितले की तो आणि त्याचा भाऊ कृणाल कोणत्याही परिस्थितीत आनंदी असतो. हे सांगताना तो म्हणाला, ‘कारण आमच्यासाठी, आम्ही जेथून आलो, ते पाहता सर्वकाही बोनस आहे.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी असे असेल हवामान
–विश्वचषक२०१९: संघ पावसामुळे तर आयसीसी नेटीझन्सच्या गमतीशीर प्रतिक्रियांमुळे हैरान
–विश्वचषक २०१९: भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल कर्णधार विराट कोहली म्हणाला…