इंडियन प्रीमीयर लीगमध्ये(आयपीएल) आत्तापर्यंत अनेक खेळाडूंनी मोठे पराक्रम केले आहेत. त्यातीलच एक विक्रम म्हणजे हॅट्रिक घेणे. आत्तापर्यंत १६ खेळाडूंनी आयपीएलमध्ये हॅट्रिक घेतली आहे. विशेष म्हणजे या १६ जणांमध्ये रोहित शर्माचाही समावेश आहे. अनेकजण रोहितला मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि फलंदाज म्हणून ओळखतात. पण त्याने विकेट्सची हॅट्रिकही घेतली आहे. या गोष्टीला ६ मे रोजी १३ वर्षे झाली आहेत.
रोहितची अष्टपैलू कामगिरी
रोहित जरी सध्या मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळत असला तरी तो २००८ ते २०१० दरम्यान डेक्कन चार्जर्स संघाचा भाग होता. ६ मे २००९ रोजी आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना झाला होता. या सामन्यात डेक्कनने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १४५ धावा केल्या होत्या. डेक्कनकडून रोहितने सर्वाधिक ३८ धावा केल्या होत्या.
त्यानंतर १४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला मुंबई संघाने १५ षटकांपर्यंत १०० धावांचा टप्पा पार केला होता. त्यावेळी त्यांनी ४ विकेट्स गमावल्या होत्या. तसेच जेपी ड्यूमिनी चांगल्या लयीत खेळत होता. पण याचवेळी डेक्कनचा कर्णधाक ऍडम गिलख्रिस्टने रोहितकडे चेंडू सोपवला.
रोहितने घेतली हॅट्रिक
रोहितने १६ व्या षटकात गोलंदाजी करताना शेवटच्या २ चेंडूंवर अभिषेक नायर, हरभजन सिंग यांना त्रिफळाचीत केले होते. त्यानंतर त्याने १८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जेपी ड्यूमिनीला यष्टीरक्षक गिलख्रिस्टकडे झेल देण्यास भाग पाडत बाद केले होते आणि हॅट्रिक साजरी केली होती.
त्यानंतर मुंबईला २० षटकात ८ बाद १२६ धावाच करता आल्या होत्या. त्यांच्याकडून ड्यूमिनीने सर्वाधिक ५२ धावा केल्या होत्या. हा सामना डेक्कनने १९ धावांनी जिंकला होता. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार रोहित शर्माला मिळाला होता.
@ImRo45 Hattrick 🔥💥💥
Love you 😘😘 #KhelRatnaForRohitSharma#RohitSharma #SarkaruVaariPaata @urstrulyMahesh #MaheshBabu pic.twitter.com/euwODwqQt2
— Jaya Simha Reddy 🎭🌶 (@Jaya_Simha_Dhfm) August 29, 2020
रोहितने डेक्कनकडून खेळताना जेव्हा ही हॅट्रिक घेतली होती तेव्हा तो केवळ २२ वर्षे ६ दिवस एवढे वय होते. त्यामुळे तो आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा सर्वात तरुण गोलंदाज ठरला होता. हा विक्रम २०१९ आयपीएलपर्यंत अबाधित होता. पण २०१९ ला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सॅम करनने हॅट्रिक घेत हा विक्रम मोडला. करनने हॅट्रिक घेतली तेव्हा तो २० वर्षे ३०२ दिवस इतक्या वयाचा होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मी म्हतारा होतोय’, सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर असं का म्हणाला वॉर्नर, वाचा सविस्तर
Video: भुवनेश्वरने ऐनवेळी बदलली भूमिका, मग वॉर्नरनेही अफलातून शॉटने दाखवला आपला क्लास
बड्या दिलाचा वॉर्नर! स्वत:च्या शतकाची नाही केली पर्वा, संधी असूनही पॉवेलला म्हणाला, तोडूनफोडून टाक!