आयपीएल २०२२ मध्ये गुरुवारी (५ मे) दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर आणि मध्यक्रमातील रोवमन पॉवेल यांनी धामाकेदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. वॉर्नरकडे या सामन्यात शतक पूर्ण करण्याची चांगली संधी होती, पण स्ट्राइकवरील पॉवेल देखील बेधडक खेळी करत असल्यामुळे त्याला शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली नाही. अर्धशतकी खेळीनंतर पॉवेलने खास खुलासा केला, ज्यामुळे वॉर्नरचे कौतुक केले जात आहे.
चालू हंगामातील हा ५० वा सामना सामना होता, ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात लढत झाली. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी केली. त्यांचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) ५८ चेंडूत ९२ धावा करून शेवटपर्यंत नाबाद राहिला. या धावा करण्यासाठी त्याने १२ चौकार आणि ३ षटकार मारले. वॉर्नर शतक पूर्ण करू शकत होता, पण शेवटच्या षटकात नॉन स्ट्राइकवर असल्यामुळे त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. पॉवेलने त्यांचा डाव संपल्यानंतर खुलासा केला की वॉर्नरने स्वतःच्या इच्छेने शतक पूर्ण केले नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शेवटच्या षटकात रोवमन पॉवेल (Rovman Powell) स्ट्राइकवर होता. जर त्याने एक धाव घेऊन वॉर्नरला संधी दिली असती, तर वॉर्नरने शतक नक्कीच पूर्ण केले असते. परंतु पॉवेलने सांगितल्यानुसार वॉर्नरने स्वतः त्याला प्रत्येक चेंडूवर मोठा शॉट खेळण्यासाठी सांगितले होते. पॉवेल म्हणाला की, “मी माझ्यापरीने पूर्ण प्रयत्न करत होतो. मला वाटायचे की, वॉर्नरने त्याचे शतक करावे, पण त्याने मला सांगितले होते की, जेवढे शक्य असेल, तेवढे मारून खेळ आणि त्याने स्वतःच्याच शतकाची पर्वा केली नाही.”
पॉवलने या सामन्यात अवघ्या ३५ चेंडूत ६७ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि ६ षटकार मारले. वॉर्नर आणि पॉवेलच्या महत्वपूर्ण अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मर्यादित २० षटकात २०७ धावा केल्या. या धावा उभ्या करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने तीन विकेट्सही गमावल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जिंकलस केन! हैदराबादविरुद्ध नाबाद ९२ धावा चोपणाऱ्या वॉर्नरची विलियम्सनने थोपटली पाठ, पाहा Photo
नवी स्पीडगन! उमरान मलिकने मोडला स्वत:चाच विक्रम, फेकला आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू
आयपीएल २०२२ची ‘फ्लॉप इलेव्हन’, रोहितकडे उपकर्णधारपद; पाहा कोण बनलंय कर्णधार