भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीनं (MS Dhoni) (15 ऑगस्ट 2020) रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. धोनीसोबत सुरेश रैनानंही (Suresh Raina) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनीनं ‘मैं पल दो पल का शायर हूं…’ या गाण्याचा व्हिडिओ शेअर करून निवृत्तीची घोषणा केली होती. आता या वेळी म्हणजेच (15 ऑगस्ट 2024) रोजी भारताचे हे 3 तीन खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणू शकतात.
1) चेतेश्वर पुजारा- भारतीय क्रिकेट संघासाठी 100 हून अधिक कसोटी सामने खेळलेल्या चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) काही काळापासून संघात स्थान मिळालं नाही. 36 वर्षीय पुजारानं जून 2023 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. आता भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी दिली जात आहे. त्याचबरोबर पुजारासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुजारा लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो.
2) अजिंक्य रहाणे- रहाणे भारताकडून क्रिकेटचे तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो केवळ कसोटी संघातच दिसत होता. रहाणेनं टीम इंडियासाठी शेवटचा सामना जुलै 2023 मध्ये खेळला, जो वेस्ट इंडिजविरुद्धचा कसोटी सामना होता. रहाणेही भारतीय कसोटी संघापासून जवळपास बाहेर पडला आहे. त्यामुळे रहाणेही लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो.
3) भुवनेश्वर कुमार- भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) नोव्हेंबर 2022 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. जे पाहता आता भुवनेश्वरसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाल्यासारखे दिसत आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमारही लवकरच निवृत्ती जाहीर करू शकतो.
चेतेश्वर पुजाराचं वय सध्या 36 वर्ष 202 दिवस आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 103 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 43.60च्या सरासरीनं 7,195 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं 35 अर्धशतक आणि 19 शतक झळकावली आहेत. तर त्याची सर्वेच्च धावसंख्या नाबाद 206 राहिली आहे. 5 एकदिवसीय सामन्यात त्यानं 51 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 10.20 राहिली आहे.
अजिंक्य रहाणेनं आतापर्यंत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत कसोटीमध्ये 85 खेळून भारतासाठी 5,077 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 38.46 राहिली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 26 अर्धशतक आणि 12 शतक आहेत. 90 एकदिवसीय सामन्यात रहाणेनं 2,962 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 24 अर्धशतक आणि 3 शतक आहेत. त्यानं भारतासाठी 20 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 113.29च्या स्ट्राईक रेटनं 375 धावा केल्या आहेत.
भुवनेश्वर कुमारनं भारतासाठी 21 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 87 टी20 सामने खेळले आहेत. 21 कसोटी सामन्यात त्यानं 63 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 26.09 राहिली. तर 121 एकदिवसीय सामन्यात त्यानं 141 विकेट्स घेतल्या आणि 87 टी20 सामन्यात त्यानं 90 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 23.10 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बुची बाबू टूर्नामेंट’ काय आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार, ईशान किशन अन् श्रेयस अय्यर सारखे स्टार खेळाडू खेळतील?
37 वर्षीय रोहित शर्माची वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप, या क्रिकेटपटूंचे मात्र नुकसान
कोण आहे इयान बेल? ज्याच्यावर श्रीलंकेने इंग्लंडला हरवणयासाठी दिली मोठी जबाबदारी