---Advertisement---

Ranchi Test । रुटमुळे इंग्लंडला नवसंजीवनी! दिवसाखेर पाहुण्यांची धावसंख्या 300+, आकशच्या नावावर सर्वाधिक विकेट्स

On: शुक्रवार, फेब्रुवारी 23, 2024 5:01 PM
Joe Root
---Advertisement---

जो रुट याने इंग्लंडसाठी शुक्रवारी (23 फेब्रुवारी) अडचणीच्या काळात महत्वपूर्ण खेळी केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना शुक्रवारी रांचीमध्ये सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडसाठी सुरुवात खूपच निराशाजनक झाली. पण दिवसाचा शेवट रुटच्या शतकामुळे पाहुण्यांसाठी गोड झाला. भारतासाठी या सामन्यात पदार्पण करणारा आकाश दीप पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात जबरदस्त लयीत होता. पण शेवटच्या दोन सत्रांमध्ये त्याल यश मिळाले नाही.

रांची कसोटीच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने 7 विकेट्सच्या नुकसानावर 302 धावांपर्यंत मजल मारली. रुटने 219 चेंडूत कराकिर्दीतील 31वे कसोटी शतक केले. दिवसाखेर रुट 106 धावांसह खेळपट्टीवर कायम आहे. दुसऱ्या दिवशी रुटच्या साथीने ओली रॉबिन्सर (31*) इंग्लंडसाठी दिवसाची सुरुवात करतील. पहिल्या दिवशी भारतासाठी आकाश दीप (Akash Deep) याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. यासाठी त्याने 17 षटके गोलंदाजी केली आणि 70 धावा खर्च केल्या. मोहम्मद सिराज यानेही 13 षटकांमध्ये 60 धावा खर्च करून दोन विकेट्स नावावर केल्या. रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण सुरुवातीच्या पाच विकेट्स संघाने पहिल्याच सत्रात गमावल्या. संघाची धावसंख्या 112 अशताना इंग्लंडने सुरुवातीच्या पाच महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या. सलामीवीर बेन डकेट याने 11, झॅक क्रॉली 42, ओली पोप 0, जॉनी बेअरस्टो 38 आणि कर्णधार बेन स्टोक्स 3 धावा करून तंबूत परतले. सहाव्या विकेटसाटी मात्र जो रुट (Joe Root) आणि यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्स यांच्यात 113 धावांची भागीदारी पार पडली. टॉम हार्टली याने 26 चेंडूत 13 धावा केल्या. (On the first day of the Ranchi Test, England scored 302 runs for the loss of 7 wickets)

रांची कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन

भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप (पदार्पण), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

महत्वाच्या बातम्या – 
IND vs ENG । भारताविरुद्ध जो रुटचं 10वं कसोटी शतक! महान फलंदाजांना न जमलेली कामगिरी केली नावावर
रणजी ट्रॉफी न खेळणं पडलं महागात! ईशान किशन आणि श्रेयस अय्यरकडे BCCI करणार कायमचं दुर्लक्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---