---Advertisement---

साॅरी..साॅरी..! पहिल्याच सामन्यात मैदानावर कर्णधार राहुलला मागावी लागली माफी, पण का? पाहा व्हिडिओ

kl-sorry
---Advertisement---

भारत आणि दक्षिण अफ्रिका (sa vs ind test series) यांच्यात सोमवारी (३ जानेवारी) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाचे प्रदर्शन निराशाजनक राहिले. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत केएल राहुल (kl rahul) संघाचे नेतृत्व करत आहे. संघाने पहिल्या डावात अपेक्षित प्रदर्शन केले नसले, तरी राहुलने मात्र त्याची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडल्याचे दिसले. दरम्यान, पहिल्या दिवशी खेळपट्टीवर असे काही घडले, ज्यामुळे केएल राहुलला पंचांची माफी मागावी लागली.

भारताचा नियमित कसोटी कर्णधार विराट कोहली (virat kohli) दुखापतीमुळे दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. दुसऱ्या सामन्यात संघाचे नेतृत्व करताना राहुलने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. राहुलने सामन्याच्या पहिल्या डावात १३३ चेंडूंचा सामना केला आणि ५० धावा ठोकल्या. यामध्ये त्याच्या नऊ चौकारांचा समावेश होता. दरम्यान, पहिल्या डावात फलंदाजी करताना पाचव्या षटकात राहुलला पंचांची माफी मागावी लागली.

सामन्याच्या पाचव्या षटकात भारताचे सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अगरवाल खेळपट्टीवर होते आणि दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा गोलंदाजीसाठी आला होता. त्याच्या षटकातील दोन चेंडू झाले होते आणि तिसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी केएल राहुल तयार दिसत होता. रबाडा तिसरा चेंडू टाकण्यासाठी जीव तोडून पळत आला आणि राहुल ऐनवेळी त्याला थांबण्याचा इशारा देत बाजूला सरकला. राहुलने अशाप्रकारे अचानक खेळपट्टीवरून बाजूला होणे पंचांनाही पटले नाही. पंच मराय इरॅस्मस यांना राहुलला यासाठी चेतावणी देखील दिली. त्यानंतर राहुलने यासाठी माफी मागितल्याचे पाहायला मिळाले.

https://twitter.com/BenaamBaadshah4/status/1477950043709534209?s=20

दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवसाचा विचार केला, तर भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाने सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा संपूर्ण संघ सामन्याच पहिल्याच दिवशी तंबूत परतला. पहिल्या डावात भारताने ६३.१ षटकात २०२ धावा केल्या. केएल राहुलव्यतिरिक्त एकही फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकला नाही. दक्षिण अफ्रिकेच्या मार्को जेन्सनने चार विकेट्स घेतल्या. तर, ऑलिव्हियर आणि कगिसो रबाडा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स नावावर केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण अफ्रिकेची धावसंख्या १ बाद ३५ अशी आहे.

महत्वाच्या बातम्या –

भारत-आफ्रिका सामन्यात पंचगिरी करणाऱ्या ‘अल्लाउद्दीन पालेकर’ यांचे कोकण कनेक्शन

मनिंदर-नबीबक्षच्या ‘सुपर टॅकल’ने बंगालचा विजयरथ कायम! अटीतटीच्या सामन्यात जयपूरचा पराभव

कर्णधार बनण्याच्या प्रश्नावर आले स्टोक्सचे उत्तर; म्हणाला, “या जबाबदारीसाठी मी…”

व्हिडिओ पाहा –

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---