भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचा पहिला सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियवर खेळला गेला. उभय संघांतील ही लढत भारतताने अवघ्या दोन धावांच्या अंतराने नावावर केली. भारतासाठी त्यांचा युवा वेगवान गोलंदाज शिवम मावी यांने सर्वोत्तम प्रदर्शन केले. मावीचा हा पदार्पणाचा सामना असून त्याने यात चार विकेट्स घेतल्या. युवा वेगवान गोलंदाज मुंबईत पदार्पणाच्या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करत असताना त्याच्या घरातील वातावरण देखील तसेच होते.
शिवम मावी (Shivam Mavi) याने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतील पहिल्या सामन्यात चार षटकात 22 धावा खर्च करत सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मावीने या सामन्यात पथुम निसंका, धनंजय डी सिल्वा, वानिंदु हसरंगा आणि महेश तिक्षणा यांना तंबूत धाडले. भारतीय संघासाठी मावी ही भेदक गोलंदाजी करत अशताना दुसरीकडे त्याच्या घरी देखील आनंदाचे वातावरण तयार झाले होते. त्याच्या घरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ घरातील सर्व सदस्य मावीच्या प्रत्येक विकेटसह अधिकच उत्साहात टाळ्या वाजवताना दिसत आहेत. व्हिडिओ चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
भारतीय संघाने दोन धावांनी जिंकला सामना
उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मर्यादित 20 षटकांमध्ये भारतीय संघ 5 बाद 162 धावा करू शकला. प्रत्युत्तारत श्रीलंकन संघ 20 षटकात 160 धावा करून सर्वबाद झाला. श्रीलंकन संघाचा कर्णधार दासुन शनाका 27 चेंडूत 45 धावांची झंजावाती खेळी करू शकला, मात्र स्वतःच्या संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही.
https://twitter.com/DhirendraGBN/status/1610602734180536320?s=20&t=nIthBzoLYolYeXAO-7jpjA
दीपक हुड्डा ठरला सामनावीर
टी-20 मालिकेतील या पहिल्या सामन्यात दीपक हुड्डा याचे अप्रतिम प्रदर्शन पाहून त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. हुड्डाने 23 चेंडूत 41 धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅठमधून एक चौकार आणि चार उत्कृष्ट षटकात पाहायला मिळाले. गोलंदाजी विभागात शिवम मावीव्यतिरिक्त उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. (On the one hand, Shivam Mavi graced the Wankhede Stadium in Mumbai and on the other hand, the family was happy at home)






