जवळपास २१ वर्षांपूर्वी क्रिकेट जगताला मोठा फटका बसला होता, जेव्हा हॅन्सी क्रोनियेसारखे मोठे नाव मॅच फिक्सिंगच्या बाबतीत समोर आले होते. त्याने सट्टेबाजांना माहिती दिल्याची आणि मॅच फिक्सिंग करण्याचेही कबूल केले होते. त्यावेळी अनेक नावे समोर आली होती. त्यामुळे संपूर्ण क्रीडाजगत हादरले होते.
परंतु क्रीडाजगताला त्याहून अधिक मोठा फटका बसला होता. ज्यावेळी या प्रकरणात २ वर्षांनंतर म्हणजेच आजपासून ठीक १८ वर्षांपूर्वी १ जून २००२ रोजी दक्षिण आफ्रिकेचा ३२ वर्षीय माजी कर्णधार हॅन्सीने एका विमान अपघातात जगाचा निरोप घेतला होता.
हॅन्सीला करायची होती दुसऱ्या पर्वाची सुरुवात
क्रिकेटमध्ये नाव खराब झाल्यानंतर हॅन्सीने व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. व्यवसाय नेतृत्वात त्यांने पदव्युत्तर पदवी मिळविली आणि दुसऱ्या पर्वाची सुरुवात करण्याची तयारी करणार होता, तेव्हा २००२मध्ये त्याचा मृत्यू झाला होता.
हॅन्सीने दक्षिण आफ्रिका संघाकडून ६८ कसोटी आणि १८८ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ३७१४ आणि वनडेत ५५६५ धावा केल्या आहेत. तसेच ५३ कसोटी सामन्यात त्याने संघाचे नेतृत्वही केले आहे. क्रिकेट जगतात हॅन्सीचे मोठे नाव होते. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक अली बेचर (Ali Bacher) यांना हॅन्सीच्या प्रामाणिकपणावर विश्वास होता. परंतु आरोप केल्याच्या ४ दिवसांनंतर हॅन्सीने पहाटे ३ वाजता फोन करत सांगितले, तो पूर्णपणे प्रामाणिक नव्हता.
एक दशकापूर्वीच पाहिला होता मृत्यू
काही वर्षांपूर्वी बीसीसीला दिलेल्या एका मुलाखतीत हॅन्सीचा मोठा भाऊ फ्रांसने खुलासा केला होता, “हॅन्सीने आपला मृत्यू एक दशकापूर्वीच पाहिला होता. त्याने एकदा म्हटले होते की, आम्ही लोक क्रिकेटसाठी खूप प्रवास करतो. कधी बसने, तर कधी विमानाने. आता वाटते, की माझा मृत्यू एका विमान अपघातात होईल.”