---Advertisement---

भारतात जन्मलेला, पण इंग्लंडकडून खेळलेला ‘तो’ क्रिकेटर १०० कसोटी खेळणारा बनला होता जगातील पहिलाच खेळाडू

On: सोमवार, जुलै 11, 2022 9:17 AM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजपर्यंत ७० खेळाडूंनी १०० किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने तर २०० कसोटी सामने खेळण्याचाही कारनामा केला. पण सर्वात पहिल्यांदा जागतिक क्रिकेटमध्ये १०० कसोटी सामने कोणी खेळले होते हे माहित आहे का? तर त्या खेळाडूचे नाव आहे कॉलिन कॉउड्रे (Colin Cowdrey).

इंग्लंडकडून क्रिकेट खेळलेले कॉउड्रे हे बरोबर ५४ वर्षांपूर्वी म्हणजेच ११ जुलै १९६८ साली १०० वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. त्यावेळी ते १०० वा कसोटी सामना खेळणारे जगातील पहिले क्रिकेटपटू ठरले होते. त्यांनी हा १०० वा सामना बर्मिंघम येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.

१०० व्या सामन्यात शतक 
ऑस्ट्रेलिया विरुद्ध कारकिर्दीतील १०० व्या कसोटी सामन्यात कॉलिन कॉउड्रे यांनी पहिल्याच डावात शतक झळकावले होते. संघाचा कर्णधार म्हणून कॉउड्रे यांनी १०४ धावा केल्या होत्या. कॉउड्रे यांच्या १०४ धावांच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियापुढे ४०९ धावांचा डोंगर उभा केला होता. ज्याच्या प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संपुर्ण संघ २२२ धावांवर गारद झाला होता.

सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडने १४२ धावा बनवून आपला डाव घोषीत केला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया समोर जिंकण्यासाठी ३३० धावांचे लक्ष्य होते. परंतु, अंतिम दिवसाच्या अखेरपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात १ बाद ६८ धावा केल्याने तो सामना अनिर्णित राहिला.

भारतात जन्म
कॉउड्रे यांचा जन्म २४ डिसेंबर १९३२ साली, उटी, तमिळनाडू येथे झाला. त्यावेळी भारतात ब्रिटिशांचे राज्य होते. जन्मानंतर काहीवर्षांनी कॉउड्रे आपल्या मायदेशी परत गेले. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळताना राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

कॉउड्रे यांची कारकिर्द 
कॉउड्रे यांनी २६ नोव्हेंबर १९५४ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी ११४ कसोटी सामने खेळले असून ४४.०६ च्या सरासरीने ७६२४ धावा केल्या. यात त्यांच्या २२ शतकांचा आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी १ वनडे सामनाही खेळला.

याबरोबरच कॉउड्रे यांनी ६९२ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. यात त्यांनी ४२.८९ च्या सरासरीने १०७ शतके आणि २३१ अर्धशतकांसह ४२७१९ धावा केल्या. तसेच ८७ अ दर्जाचे सामने खेळताना त्यांनी १९७८ धावा केल्या आहेत. यात त्यांच्या ३ शतकांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या काळात कसोटी खेळणाऱ्या सर्व सहा संघांविरुद्ध कॉउड्रे यांनी शतकं केली होती. त्यांनी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, भारत आणि पाकिस्तान संघांविरुद्ध मायदेशात तसेच परदेशात शतकं केली आहेत. त्यांनी २७ कसोटीत इंग्लंड संघाचे नेतृत्त्वही केले. त्यांच्या नेतृत्वाखााली दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये इंग्लंडने मालिकेत विजय मिळवला होता. (On this day Colin Cowdrey becomes first cricketer to play 100 test)

आयसीसीचे अध्यक्ष
कॉउड्रे १९८६ साली क्रिकेट नियम बनवणाऱ्या मेरिलबन क्रिकेट क्लबचे अध्यक्ष झाले होते. तसेच त्यानंतर ते १९८९ ते १९९३ दरम्यान ते आयसीसीचेही अध्यक्ष होते. त्यांनी सामनाधिकारी आणि पंच म्हणूनही काम केले.

कॉउड्रे यांचे ४ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या –

आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव ठरला केवळ दुसराच फलंदाज, वाचा खास विक्रम

‘सिक्सर किंग’च्या संघापुढेच लिविंगस्टोनने मारला ८० मीटरचा षटकार, व्हिडिओ तुफान व्हायरल

एकच वादा, सूर्या दादा! झंझावाती शतक करत सूर्यकुमारने जिंकली मने, ठरला पाचवाच भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---