---Advertisement---

बरोबर १५ वर्षांपुर्वी १२७ किलो वजनाच्या क्रिकेटपटूने घेतला होता उथप्पाचा नेत्रदिपक झेल, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक सर्वोत्तम झेल घेतले गेले आहेत. पण बरोबर १४ वर्षांपूर्वी जेव्हा एका १२७ किलो वजनाच्या क्रिकेटपटूने भारताचा क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाचा झेल घेतला होता तेव्हा सर्वांना थक्क केले होते.

झाले असे की २००७ ला झालेल्या वनडे विश्वचषकात बर्मुडा संघाचाही समावेश होता. त्यांना भारत, श्रीलंका आणि बांगलादेशसह एका गटात सामील करण्यात आले होते. समोर बलाढ्य संघ असताना बर्मुडा संघाकडे गमावण्यासारखे तसे काही नव्हतेच. पण १९ मार्च २००७ला बर्मुडाच्या ड्वेन लेव्हरॉकने भारताविरुद्धच्या सामन्यात उथप्पाचा झेल घेतला आणि सर्वांना एक अविस्मरणीय आठवण दिली.

क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. त्यावेळी भारताकडून उथप्पा आणि सौरव गांगुली सलामीला फलंदाजीसाठी उतरले.

सामन्याच्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर उथप्पा फलंदाजी करत होता. यावेळी त्याने मलाची जोन्सने टाकलेल्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या १२७ किलो वजनाच्या लेव्हरॉकच्या दिशेने गेला.

विशेष म्हणजे लेव्हरॉकने कोणतीही चूक न करता उजवीकडे उडी मारत एका हाताने तो झेल घेतला आणि उथप्पाला माघारी धाडले. एवढ्या वजनाच्या एका खेळाडू असा शानदार झेल घेतलेला पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्यावेळी लेव्हरॉकचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. हा झेल घेतल्यानंतर लेव्हरॉकसह बर्मुडा संघाने मोठे सेलिब्रेशन केले होते. त्याच्या या झेलची आजही चर्चा होत असते.

पुढे जाऊन भारताने या सामन्यात ५० षटकात ५ बाद ४१३ धावा केल्या होत्या. त्यावेळी विरेंद्र सेहवागने ११४ धावांची शतकी खेळी. तर गांगुलीने ८९ आणि युवराज सिंगने ८३ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर ४१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बर्मुडाचा डाव १५६ धावांवरच संपुष्टात आल्याने भारताने हा सामना २५७ धावांनी जिंकला होता. पण असे असले तरी या सामन्यात लेव्हरॉकच्या झेलने मोठी छाप पाडली होती. त्याने या सामन्यात युवराज सिंगची विकेटही घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

मागच्या हंगामात फेल झालेला ‘हा’ पठ्ठ्या म्हणतोय, ‘मला सनरायझर्सचे पैसे परत करायचेत…’

भारतीय संघाला मिळाला नवीन ‘हिटमॅन?’, रोहितची जागा घेत पाडणार धावांचा पाऊस

शुबमन गिल ते ऋतुराज गायकवाड, भारतीय संघाचे भविष्यातील ५ सलामीवीर; पाहा संपूर्ण यादी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---