दोन वर्षांपूर्वी झालेल्या वनडे विश्वचषक २०१९ स्पर्धेत, इंग्लंड संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत करत विश्वचषकाला गवसणी घातली होती. या स्पर्धेतील अंतिम सामना सर्वांना कायम आठवण राहील अशातलाच होता. पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर दुसऱ्यांदाही हा सामना बरोबरीत सुटला होता. या सामन्यात सर्वाधिक चौकार आणि षटकार मारणाऱ्या संघाला विजेता घोषित करण्यात आले होते. तसेच या संपूर्ण स्पर्धेत कर्णधार ओएन मॉर्गनने तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने आजच्या दिवशी (१८ जून) २०१९ विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात धावांचा पाऊस पाडला होता.
मॉर्गनने अफगाणिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अवघ्या ७१ चेंडूत १४८ धावांची तुफानी खेळी केली होती. यामध्ये त्याने तब्बल १७ षटकार लगावले होते. म्हणजेच त्याने अवघ्या १७ चेंडूत षटकारांच्या मदतीने १०२ धावा चोपल्या होत्या. या खेळीत त्याने ४ चौकार देखील मारले होते. या सामन्यात इंग्लंड संघाने ६ गडी बाद ३९७ धावा केल्या होत्या. मॉर्गन व्यतिरिक्त जो रूटने ८८ धावा आणि जॉनी बेअरस्टोने ९० धावांची खेळी केली होती. या सामन्यात इंग्लंड संघातील फलंदाजांनी तब्बल २५ षटकार ठोकले होते, जे वनडे सामन्यातील सर्वाधिक षटकार ठरले.
राशिद खानच्या गोलंदाजीवर लगावले होते ११ षटकार
या सामन्यात अफगाणिस्तान संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा फिरकीपटू राशिद खानच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली होती. त्यांनी राशिद खानने टाकलेल्या ९ षटकात तब्बल ११० धावा चोपल्या होत्या. यामध्ये ११ षटकारांचा समावेश होता. या कामगिरीनंतर राशिद खान विश्वचषक स्पर्धेतील सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता. (On this day: Eoin Morgan scored most sixes in an innings against Afghanistan)
तेव्हापासून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा खर्च करण्याच्या बाबतीत, राशिद खान तिसऱ्या क्रमांकावर आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा खर्च करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या माईक लुईस याच्या नावावर आहे. त्याने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १० षटकात ११३ धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या स्थानी पाकिस्तान संघाचा वाहब रियाज आहे. त्याने २०१६ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १० षटकात ११० धावा खर्च केल्या होता.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीने तुझी कारकिर्द संपुष्टात आणली? चाहत्याच्या प्रश्नावर सेहवागने दिले होते ‘असे’ उत्तर
न्यूझीलंड संघाने अद्याप केली नाही प्लेइंग इलेव्हनची घोषणा; प्रशिक्षकाने सांगितले यामागचे कारण
WTC मध्ये सर्वाधिक सरासरी राखणारे फलंदाज, दोन अनपेक्षित भारतीयांचा समावेश