२०१९चा एकदिवसीय विश्वचषक होऊन आता २ वर्ष झाली आहेत. या विश्वचषकात भारतीय संघाने उपांत्यफेरी पर्यंत मजल मारली होती. तर अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड असा झाला होता. जसा अंतिम सामना प्रेक्षकांना हवा असतो तसाच झाला. अंतिम सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. सामन्याचा निकाल सुपर ओवरने लागला आणि इंग्लंड संघ त्यात विजयी झाला. पहिल्यांदाच इंग्लंड संघ विश्वचषक जिंकला आणि संघाचा कर्णधार होता ईओन मोर्गन. मोर्गनने २०१९च्या विश्वचषकात खूप चांगल्या प्रकारे कर्णधारपद भूषवले. परंतु, बरोबर आजच्याच दिवशी दोन वर्षापूर्वी इंग्लंडच्या कर्णधाराने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना नाकीनऊ आणले होते. आज आपण मोर्गनच्या त्याच खेळीला उजाळा देऊयात.
इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तनच्या या सामन्यात मोर्गन नावाचे वादळ आले होते. विश्वचषक २०१९ मध्ये इंग्लंडचा कर्णधार मोर्गन अफगाणिस्थानच्या गोलंदाजांवर हात धुवून मागे लागला होता. मोर्गनने त्या सामन्यात ७१ चेंडूत १४८ धावा केल्या होत्या. आपल्या शतकी खेळीत मोर्गनने तब्बल १७ षटकार आणि ४ चौकार लगावले. १४८ धावांमधील ११८ धावा मोर्गनने फक्त षटकार आणि चौकाराच्या मदतीने केल्या होत्या. या सामन्यात जो रूटने ८८ तर, जॉनी बेयरस्टोने ९० धावांची खेळी केली होती.
याच खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाने या सामन्यात ३९७ धावांचा डोंगर उभा केला होता. इंग्लंड संघाने २०१५ पासून ते या सामन्यापर्यंत तब्बल सात वेळा ३७५ पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ या विश्वचषकात खूप सुंदर फॉर्ममध्ये होता. ३९७ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तन संघाने २४७/८ धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने दणदणीत २५ षटकार ठोकले.
या सामन्यात अफगाणिस्तानचा अव्वल गोलंदाज राशिद खानला सर्वात जास्त मार पडला. राशिदच्या ९ षटकात इंग्लंडच्या फलंदाजांनी एकूण ११० धावा लुटल्या. इंग्लंडच्या फलंदाजांनी एकट्या राशिदला ११ षटकार मारले. राशिदने १२.२२च्या सरासरीने धावा दिल्या. ज्या विश्वचषक इतिहासातील एका गोलंदाजाकडून दिलेल्या सर्वात जास्त धावा होत्या.
महत्वाच्या बातम्या-
वाचाल तर वाचाल! सामना सुरू होण्याआधी न्यूझीलंडच्या खेळाडूंचा फोटो व्हायरल
WTC Final: पावसामुळे चिंतेचे कारण नाही, आयसीसीची ‘ही’ तरतुद भरून काढणार वाया गेलेला वेळ
भारतीय महिलांची आश्चर्यकारक घसरगुंडी, १६७ धावांच्या सलामीनंतर २३१ वर आटोपला डाव