बरोबर ३० वर्षांपुर्वी १४ ऑगस्ट १९९०ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने कारकिर्दीतील पहिली शतकी खेळी केली होती. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील हा दुसरा कसोटी सामना मॅंचेस्टरला झाला होता.
या सामन्यातील चौथ्या डावातील ६व्या दिवशी सचिनने हा कारनामा केला होता. या सामन्यात चौथा दिवस विश्रांतीसाठी राखीव होता.
पहिल्या डावात सचिनने १३६ चेंडूत ६८ धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात १८९ चेंडूत नाबाद ११९ धावा केल्या.
#OnThisDay in 1990, Sachin Tendulkar made the first of his hundred international hundreds.
His unbeaten final-day 119 helped India save the second Test against England at Old Trafford, and made him Test cricket's third youngest centurion 👏 pic.twitter.com/0pYtPMVQju
— ICC (@ICC) August 14, 2019
एकवेळ सामना वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भारताला हा सामना जिंकायची चांगली संधी होती परंतु अखेरच्या दिवशी केवळ ६४ धावांमुळे हा सामना अनिर्णित राहिला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने पहिल्या डावात ५१९ तर दुसऱ्या डावात ४ बाद ३२० धावा केल्या. पहिल्या डावातील ५१९ला उत्तर देताना भारताचा डाव ४३२ धावांत संपुष्टात आला.
त्यामुळे भारताला चौथ्या डावात ४०७ धावा करत सामना जिंकण्याची संधी होती. परंतु शेवटच्या दिवशी भारतीय संघ ६ बाद ३४३ धावांपर्यंतच मजल मारु शकला.
जेव्हा या सामन्यात सचिनने हे शतक केले होते तेव्हा त्याचे वय फक्त १७ वर्ष आणि ११२ दिवस होते. कसोटीत शतक करणारा तो तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता.
तसेच पुढे २००४मध्ये सचिनने बांगलादेशविरुद्ध कसोटीतील वैयक्तिक सर्वोच्च धावा (२४८) केल्या. आज सचिनच्या नावावर कसोटीत ५१ तर वनडेत ४९ शतके आहेत.
वाचा –
क्रिकेटला रामराम केल्यावर मॅनेजमेंटची डिग्री घेऊन अमेरिकन एक्सप्रेससाठी काम करणारा क्रिकेटर
आचरेकर सर म्हणत, “प्रवीण हा सचिनपेक्षा काकणभर सरस आहे”
…आणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली