fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

बरोबर २९ वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा

बरोबर २९ वर्षांपुर्वी १४ ऑगस्ट १९९०ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने कारकिर्दीतील पहिली शतकी खेळी केली होती. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील हा दुसरा कसोटी सामना मॅंचेस्टरला झाला होता.

या सामन्यातील चौथ्या डावातील ६व्या दिवशी सचिनने हा कारनामा केला होता. या सामन्यात चौथा दिवस विश्रांतीसाठी राखीव होता.

पहिल्या डावात सचिनने १३६ चेंडूत ६८ धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात १८९ चेंडूत नाबाद ११९ धावा केल्या.

एकवेळ सामना वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भारताला हा सामना जिंकायची चांगली संधी होती परंतु अखेरच्या दिवशी केवळ ६४ धावांमुळे हा सामना अनिर्णित राहिला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने पहिल्या डावात ५१९ तर दुसऱ्या डावात ४ बाद ३२० धावा केल्या. पहिल्या डावातील ५१९ला उत्तर देताना भारताचा डाव ४३२ धावांत संपुष्टात आला.

त्यामुळे भारताला चौथ्या डावात ४०७ धावा करत सामना जिंकण्याची संधी होती. परंतु शेवटच्या दिवशी भारतीय संघ ६ बाद ३४३ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

जेव्हा या सामन्यात सचिनने हे शतक केले होते तेव्हा त्याचे वय फक्त १७ वर्ष आणि ११२ दिवस होते. कसोटीत शतक करणारा तो तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता.

तसेच पुढे २००४मध्ये सचिनने बांगलादेशविरुद्ध कसोटीतील वैयक्तिक सर्वोच्च धावा (२४८) केल्या. आज सचिनच्या नावावर कसोटीत ५१ तर वनडेत ४९ शतके आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

राहुल द्रविडला हितसंबंधाच्या प्रकणात मिळाला मोठा दिलासा

४२वे वनडे शतक केल्यानंतर विराट कोहलीचे़ गांगुलीने असे कले कौतुक…

आयपीएल २०२०मध्ये अजिंक्य रहाणे या संघाकडून खेळणार?

You might also like