मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जागतिक क्रिकेटमध्ये फलंदाजीत विक्रमांचा डोंगर उभा केला आहे.
यामधीलच एक विक्रम सचिनने आजच्या दिवशी 11 वर्षांपुर्वी म्हणजेच 29 जून 2007 रोजी केला होता.
29 जून 2007 ला भारत विरुद्ध दक्षिण अफ्रीका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15000 धावांचा टप्पा पार करणारा पहिला फलंदाज ठरला होता.
या सामन्याच्या सतराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आंन्द्रे नेलला कव्हर्सला मारलेल्या ड्राइव्हवर एक धाव घेत सामन्यातील अर्धशतक आणि एकदिवसीय कारकिर्दित 15 हजार धावांचा टप्पा सचिनने ओलांडला होता.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15 हजार धावा करणारा सचिन आजही जगातील एकमेव फलंदाज आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभूत झालेला भारतीय संघाने या सामन्यात सचिनने केलेल्या 93 धावांच्या मदतीने सामना जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
तसेच सचिनने केलेल्या 93 धावांसाठी या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारी गोष्ट, मोठा खेळाडू करतोय पुनरागमन
-कॅप्टन कूल धोनीच्या नावावर जगातील सर्वात कूल विक्रम!