इंडियन प्रीमीयर लीग म्हणजेच आयपीएल सुरु होऊन आज(१८ एप्रिल) बरोबर १३ वर्षे झाली आहे. १२ वर्षांपूर्वी १८ एप्रिल २००८ ला आयपीएलचा पहिला सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर आत्तापर्यंत या १३ वर्षांमध्ये आयपीएलने जगभरात मोठी लोकप्रियता मिळवली. जगातील एक सर्वोत्तम क्रिकेट लीग म्हणून आयपीएलकडे आता पाहिले जाते.
आयपीएलमध्ये १३ वर्षांपूर्वी एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुुरु येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना झाला होता. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना ब्रेंडन मॅक्यूलमने ७३ चेंडूत १० चौकार आणि १३ षटकारांसह नाबाद १५८ धावांची तुफानी खेळी केली होती.
त्याच्या या तुफानी खेळीने आयपीएलला ग्रँड सुरुवात करुन दिली. अनेक तज्ञांच्या मते मॅक्यूलमच्या त्या खेळीचा आयपीएलच्या यशात फार मोठा वाटा आहे. त्या पहिल्या सामन्यात मॅक्यूलमच्या शतकी खेळीच्या जोरावर कोलकाताने पहिल्या डावात २० षटकांत ३ बाद २२२ धावा केल्या होत्या आणि बेंगलोरला २२३ धावांचे आव्हान दिले होते.
पहिला सामना घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बेंगलोर संघाचा डाव केवळ ८२ धावांवर संपुष्टात आला होता. त्यांच्याकडून केवळ प्रविण कुमारला दोन आकडी धावसंख्या पार करता आली होती. त्याने नाबाद १८ धावा केल्या होत्या. बाकी अन्य १० फलंजदा एक आकडी धावसंख्येवर बाद झाले होते. त्यामुळे हा सामना कोलकाताने १४० धावांनी जिंकत आयपीएलला शानदार सुुरुवात करुन दिली होती. (On this day in 2008 first match played in ipl history)
Remember the time – @Bazmccullum and @KKRiders #IPL pic.twitter.com/GaWGtupgnO
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2017
त्यावर्षी म्हणजेत २००८ ला आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावण्याचा मान राजस्थान रॉयल्सने मिळवला. त्यांनी अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता. २००९ ला डेक्कन चार्जर्स संघाने विजेतेपद पटकावले. २०१० आणि २०११ ला सलग २ वर्षे चेन्नई सुपर किंग्सने विजेदेपदावर शिक्कामोर्तब केले.
साल २०१२ ला कोलकाता नाईट रायडर्सने त्यावेळीच्या गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले. २०१३ ला मुंबई इंडियन्सने त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद मिळवले. २०१४ ला पुन्हा कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद मिळवले. तर २०१५ ला मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा विजेदेपद मिळवले.
साल २०१६ ला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत करत सनरायझर्स हैद्राबादने विजेतेपद पटकावले. २०१७ ला पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने विजेतेपदाची ट्रॉफी मिळवत हॅट्रिक केली. २०१८ ला आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग आणि बेटींग प्रकरणामुळे आलेल्या २ वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई सुपर किंग्सने दमदार पुनरागमनासह तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपदालाही गवसणी घातली.
साल २०१९ ला मुंबई इंडियन्सने विजेतेपद जिंकद आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ४ विजेतेपदे जिंकण्याचा कारनामा केला. एवढेच नाही तर २०२० सालचे आयपीएल विजेतेपद जिंकून त्यांनी विक्रमी ५ वे आयपीएल विजेतेपदही जिंकले. पहिल्या आयपीएल मोसमापासून खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्स (आधीचे नाव किंग्स इलेव्हन पंजाब) आणि दिल्ली कॅपिटल्स (आधीचे नाव दिल्ली डेअरडेविल्स) यांना एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही.
१३ वर्षांतील आयपीएल बाबतची ही काही आकडेवारी –
सर्वाधिक विजेतेपदे – मुंबई इंडियन्स – ५ विजेतेपदे
सर्वाधिक धावा – विराट कोहली – ५९४९ धावा
सर्वाधिक शतके – ख्रिस गेल – ६ शतके
सर्वाधिक अर्धशतके – डेव्हिड वॉर्नर – ४९ अर्धशतके
सर्वाधिक विकेट्स – लसिथ मलिंगा – १७० विकेट्स
सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन – अल्झारी जोसेफ – १२ धावांत ६ विकेट्स
वैयक्तिक सर्वाधिक सामने – एमएस धोनी – २०६ सामने
सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारा कर्णधार – एमएस धोनी – १९० सामने
पंच म्हणून सर्वाधिक सामने – सुंदरम रवी – १२३ सामने
महत्त्वाच्य़ा बातम्या –
व्हिडिओ : मॅक्सवेलचे अर्धशतक होताच कोहली झाला भलताच खुश, उत्साहात केले अभिनंदन
काय सांगता! तब्बल १९५ आयपीएल सामन्यानंतर विराट अशाप्रकारे झाला बाद
राहुल त्रिपाठीने पकडला विराटचा हंगामातील सर्वोत्कृष्ट झेल? व्हिडिओ होतोय व्हायरल