भारताचा धडाकेबाज माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग नेहमीच त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. सेहवागने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक मोठ्या आणि वादळी खेळी केल्या आहेत. सेहवाग हा भारताकडून कसोटीमध्ये 2 त्रिशतके करणारा एकमेव खेळाडू आहे. विशेष म्हणजे सेहवागला तिसरे त्रिशतक करण्याचीही संधी चालून आली होती. परंतु, केवळ 7 धावांसाठी ती संधी हुकली. याच सेहवागच्या 293धावांच्या खेळीला रविवारी( 4 डिसेंबर) 12वर्षे पूर्ण झाली आहेत.
सेहवागने सन 2009 ला 2 ते 6 डिसेंबरदरम्यान श्रीलंकेविरुद्ध मुंबई येथे झालेल्या कसोटी सामन्यात 293 धावांची शानदार खेळी केली होती.
या सामन्यात श्रीलंकेने पहिल्या डावात ३९३ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने पहिला डाव 9 बाद 729 धावांवर घोषित केला होता. या डावात सेहवागने दुसऱ्या दिवशी फलंदाजीला येत दिवसाखेर नाबाद 284 धावा केल्या होत्या.
त्यामुळे सर्वांना वाटले होते की आता सेहवाग त्याच्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे त्रिशतक नक्की पूर्ण करणार. कारण सेहवागचा फॉर्म चांगला होता. तो त्याच्या आक्रमक लयीत खेळत होता. त्यामुळे त्याला इतिहास रचताना पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी स्टेडियमवर हजेरी लावली होती.
मात्र सेगवाग तिसऱ्या दिवशी केवळ 9 धावा जोडू शकला आणि तो 293 धावांवर तिसऱ्या दिवशी मुरलीधरनच्या गोलंदाजीवर बाद झाला. विशेष म्हणजे मुरलीधरननेच सेहवागचा झेलही घेतला होता. सेहवागने ही खेळी करताना फक्त 254 चेंडू खेळले होते आणि 40 चौकार आणि 7 षटकार मारले होते. जर त्यावेळी सेहवागने त्रिशतक केले असते तर कसोटीमध्ये तीन त्रिशतके करणारा तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला असता.
💥 293 off 254 balls
💥 40 fours, seven sixes#OnThisDay in 2009 in Mumbai, Virender Sehwag finished seven runs shy of a record third triple ton 😖Do you remember who the opponents were? pic.twitter.com/fsA7jRpac7
— ICC (@ICC) December 4, 2020
पुढे सेहवागच्या या खेळीच्या जोरावर भारताने हा सामना 1 डाव आणि 24 धावांनी जिंकला होता. या विजयामुळे भारतीय संघ पहिल्यांदाच आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावरही आला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष- क्रिकेटर अजित आगरकर
मेस्सीने रचला इतिहास! सामना संपण्यास 1 मिनिट असताना मार्टिनेझच्या भन्नाट सेव्हने अर्जेंटिना सुपर 8मध्ये