---Advertisement---

विराटला सचिनच्या फेअरवेलच्या सामन्यात होती द्विशतकाची संधी

On: शुक्रवार, मार्च 18, 2022 10:49 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर बरोबर १० वर्षांपुर्वी अर्थात १८ मार्च २०१२ रोजी आपला शेवटचा वनडे सामना खेळला. या सामन्यात सचिनने ५२ धावांची खेळी केली होती. पाकिस्तान संघाविरुद्ध आशिया कपमध्ये ढाक्यात हा सामना झाला होता. हा सचिनचा शेवटचा वनडे सामना आ,हे असे तेव्हा कुणालाही वाटले नव्हते. सचिनने काही महिन्यांची वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

परंतु, हा सामना अजून एका अर्थाने कायम लक्षात राहिल. याच सामन्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार व तेव्हाचा स्टार युवा फलंदाज विराट कोहलीने १४८ चेंडूत १८३ धावा केल्या होत्या. जवळपास साडेतीन तास फलंदाजी करताना विराटने २२ चौकार व १ षटकार मारला होता, तेही धावांचा पाठलाग करताना हे विशेष.

पाकिस्तानने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३२९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना केवळ ४ विकेट गमावत भारताने हा कारनामा केला होता. यात विराटचा वाटा सर्वात मोठा होता.

विराट जेव्हा बाद झाला, तेव्हा सामन्यातील ३ षटके बाकी होती व भारताला विजयासाठी १२ धावांची गरज होती. जर या सामन्यात पाकिस्तानने थोड्या जास्त धावा केल्या असत्या व विराट बाद नसता झाला तर त्याला २०० धावा करण्याची मोठी संधी होती. परंतु, म्हणतात ना क्रिकेटमध्ये जर-तरला काही महत्त्व नसते.

भारताकडून वनडेत केलेली ही सहाव्या क्रमांकाची मोठी खेळी आहे. या यादीत २६४ धावांसह रोहित शर्मा आजही अव्वल स्थानी आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

पाकिस्तानच्या ‘त्या’ पराभवानंतर झालेला इंग्लंडच्या दिग्गजाचा मृत्यू, पोलिसांनी मर्डर केस म्हणून केलेला तपास

कारकिर्दीत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात एकतरी झेल घेणारा भारतीय दिग्गज

विराटला सचिनच्या फेअरवेलच्या सामन्यात होती द्विशतकाची संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---