साल २००७ चा विश्वचषक कोणताही क्रिकेटप्रेमी विसरु शकत नाही. कारण या विश्वचषकात भारतीय संघ पहिल्याच फेरीत विश्वचषकातून बाहेर पडला होता. मात्र त्यापेक्षा मोठी व भयावह घटना ही घडली होती की, विश्वचषकादरम्यान पाकिस्तानच्या हॉटेलमध्ये तत्कालिन पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा मृतदेह सापडला होता.
क्रिकेटमधील निवृत्तीनंतर वूल्मर हे इंग्लंड संघाचे प्रशिक्षक आणि समालोचकही होते. त्यांनी त्यांच्या प्रशिक्षक कारकिर्दीत वार्विकशायर, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघाला प्रशिक्षण दिले आहे.
२००७ सालच्या विश्वचषकावेळी ते पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक होते. यावेळी साखळी फेरीत १७ मार्च २००७ रोजी पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड संघात सामना झाला होता. विशेष म्हणजे, या सामन्यात आयर्लंडसारख्या कमजोर संघाने पाकिस्तानला ३ विकेट्सने मात दिली होती. त्यामुळे पाकिस्तान संघ पहिल्याच फेरीत विश्वचषकातून बाहेर पडला होता आणि त्याच्या काही तासांनंतर वूल्मर यांचा रहस्यमय स्थितीत मृत्यू झाला होता.
असे म्हटले जाते की, त्या सामन्यातील पराभवामुळे वूल्मर हे खूप दबावात होते. त्यामुळे त्यांनी खूप ड्रिंक केले होते. त्याच्या काही वेळानंतर पाकिस्तानच्या हॉटेलमधील त्यांच्या खोलीत ते बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यामुळे त्यांना जमैकाच्या एका दवाखान्यात नेण्यात आले होते आणि तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले होते.
वूल्मर यांच्या रहस्यमय निधनामुळे पूर्ण क्रिकेटजगतात दु:खाचे वातावरण पसरले होते. जमैका पोलिसने त्या पूर्ण प्रकरणाची मर्डर केस म्हणून तपासणी करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या मृत्यूच्या ३ दिवसांनंतर जमैका पोलिसने वूल्मर यांचा खून झाल्याचा सांगतिले होते. पण, पूर्ण तपासणीनंतर वूल्मर यांचा मर्डरमुळे नाही तर आरोग्यासंबंधित कारणामुळे मृत्यू झाल्याने पोलिसांनी सांगितले होते. (Bob Woolmer died suddenly just a few hours after pakistan team out from 2007 cricket world cup.)
१४ मे १९४८ ला वूल्मर यांचा उत्तर प्रदेशमधील कानपुर येथे जन्म झाला होता. भारतात जन्म झाला असुनही वूल्मर यांनी इंग्लंड संघाकडून कसोटी क्रिकेट खेळले होते. ६ फूट उंचीच्या या माजी क्रिकेटपटूने त्यांच्या कारकिर्दीत एकूण १९ कसोटी सामने खेळत १०५९ धावा केल्या होत्या. यात त्यांच्या ३ शतकांचा आणि २ अर्धशतकांचा समावेश होता. तसेच, त्यांनी ६ वनडे सामने खेळत २१ धावांही केल्या होत्या.
१८ मार्च २००७ ला मृत्यू झालेल्या वूल्मर यांचे नाव जगातील दिग्गज प्रशिक्षकांच्या यादीत घेतले जात असे.
महत्त्वाच्या बातम्या –
कारकिर्दीत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात एकतरी झेल घेणारा भारतीय दिग्गज