ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंच हा आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो आक्रमक फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना अडचणीत टाकत असतो. सध्या तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत असला, तरीदेखील त्याने ८ वर्षांपूर्वी अशी काही कामगिरी केली होती, जी खेळी पाहून अनेकांना आश्चर्य वाटले होते.
ऑस्ट्रेलियन संघ २०१३ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर होता. तर टी -२० मालिकेतील पहिला सामना २९ ऑगस्ट रोजी पार पडला होता. या सामन्यात फिंचने विस्फोटक फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांचा घाम काढला होता. त्याने या सामन्यात अवघ्या ६३ चेंडूंचा सामना करत ११ चौकार आणि १४ षटकांरांसह १५६ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाला २० षटकांअखेर २४८ धावा करण्यात यश आले होते.
या खेळी दरम्यान त्याने सीमारेषेबाहेर एकूण २५ चेंडू केले होते. या २५ चेंडूत त्याने चौकार-षटकारांच्या रुपात तब्बल १२८ धावा वसूल केल्या होत्या.
फिंच या सामन्यात सलामीला फलंदाजी करण्यासाठी आला होता. यादरम्यान त्याने दुसऱ्या विकेटसाठी शॉन मार्शसोबत मिळून ११४ धावांची भागीदारी केली होती. तर तिसऱ्या विकेटसाठी त्याने शेन वॉटसन सोबत मिळून १०१ धावांची भागीदारी केली होती. फिंचने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला होता.
या सामन्यात फिंचने २६ चेंडूंमध्ये अर्धशतक तर ४७ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले होते. ही विक्रमी खेळी करत त्याने ब्रेंडन मॅक्क्यूलमचा विक्रम मोडून काढला होता. मॅक्क्यूलमने २०१२ मध्ये पलेक्कलेच्या मैदानावर बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या टी -२० सामन्यात १२३ धावांची विक्रमी खेळी केली होती.
156 off 63 balls to post the then highest T20I score!
Aaron Finch was on fire against England in Southampton on this day in 2013 🔥 pic.twitter.com/pzTez5rbnO
— ICC (@ICC) August 28, 2021
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, फिंचच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने २४८ धावा केल्या होत्या. तर इंग्लंड संघाकडून डर्नबॅकने ३४ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले होते.(On this day in 2013 Aaron finch scored 156 runs in just 63 deliveries)
ऑस्ट्रेलियन संघाने दिलेल्या २४९ धावांचा पाठलाग करताना जो रुटने सर्वाधिक ९० धावांची खेळी केली होती. तर रवी बोपाराने ४५ धावांचे योगदान दिले होते. परंतु, इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. ज्यामुळे इंग्लंड संघाला २० षटकांअखेर ६ बाद २०९ धावा करता आल्या. हा सामना इंग्लंड संघाने ३९ धावांनी गमावला होता.
त्यानंतर २०१८ मध्ये फिंचने झिम्बाब्वे संघाविरुद्ध १७२ धावांची विक्रमी खेळी केली होती. ही खेळी अजूनही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी वैयक्तिक खेळी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पॅरालिम्पिकमध्ये भारताला दिवसातील तिसरे पदक, ४१ वर्षीय विनोद कुमारने जिंकले ‘कांस्य’
पॅरालिम्पिकमध्ये भाविनाबेनची ‘रुपेरी’ कामगिरी, ‘या’ लोकांना केले पदक समर्पित
पुजारा, रहाणेनंतर आता रिषभ पंत चाहत्यांच्या रडारवर; ‘या’ खेळाडूला खेळवण्याची होतेय मागणी