बरोबर ५ वर्षांपुर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने याच दिवशी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. १० आॅक्टोबर २०१३ रोजी बीसीसीआयने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ही निवृत्तीची घोषणा केली होती.
भारत दौऱ्यावर आलेल्या विंडीज मालिकेतील दुसऱ्या कसोटीत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिन १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान सचिनने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची घोषणा केली होती.
सचिनने त्यापुर्वीच २०१२मध्ये वन-डे तर २००७ मध्येच टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे चाहते २०१३मध्ये फक्त कसोटी, आयपीएल तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटच्या माध्यमातूनच सचिनचा खेळ पहात होते.
अंतिम सामना पकडून सचिन २०१३मध्ये एकूण ६ सामने खेळला. त्यात ३४. ५०च्या सरासरीने २७६ धावा करु शकला.
अंतिम सामना हा सचिनचा कसोटीतील २००वा सामना होता.
२०११ क्रिकेट विश्वचषकानंतर सचिनच्या निवृत्तीची चर्चा सुरु होती. त्यात शतकांचे महाशतक सचिनने २०१२मध्ये पुर्ण केल्यावर तर ही चर्चा जास्तच होऊ लागली. कामगिरीत नसलेल्या सातत्यामुळे या काळात सचिनवर जोरदरा टीकाही झाली.
या सर्व कारणामुळे २४ वर्षांच्या कारकिर्दीला बाय बाय करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची सचिनने ५ वर्षापुर्वी घोषणा केली होती. त्यानंतर केवळ ४ दिवसांनी अर्थात १४ नोव्हेंबरला सचिनने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी वानखेडेत मैदानात पाऊल ठेवले तर एक दंतकथा झालेल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट १६ नोव्हेंबर रोजी झाला.
#ThankYouSachin @sachin_rt 200 Tests, 15,921 runs pic.twitter.com/MSLM9k13iY
— ICC (@ICC) November 16, 2013
https://twitter.com/nitinsachinist/status/931017430696042496
One man walks billions cried 😭😭
This video literally made me Cry 😭 Heart touching 💗💔 @sachin_rt @100MasterBlastr #ThankYouSachin #CrickeTendulkar #Sachin #MySachinMoment #RetirementAnniversary #SRT200 pic.twitter.com/sWpJqG0DLz— Sachin Trends (@SachinTrends) November 16, 2017
@BCCI #ThankYouSachin love u sir… proud to be born in the generation where u played cricket… #respect #legend_never_retired…
— Nachiket (@NachiDharankar) November 19, 2013
Saaheb alet batting la!!!! Cmonnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn…. #INDvWI #ThankYouSachin @meeSherry
— Nishad (@TheCricketist) November 14, 2013
महत्वाच्या बातम्या-
- धोनीच्या या निर्णयाने खलील अहमद झाला निशब्द
- भारताविरूद्धच्या वन-डे आणि टी-20 मालिकेतून विंडिजच्या २ मोठ्या खेळाडूंना डच्चू
- धोनीचा आश्चर्यचकित करणारा निर्णय, आता या संघासाठी खेळणार
- निवड समिती कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक शात्रींच्या हातातील खेळणं
- कसोटीत स्थान न मिळालेला रोहित शर्मा खेळणार या संघाकडून