---Advertisement---

बरोबर एक वर्षापूर्वी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात केला होता हा मोठा पराक्रम

---Advertisement---

मागीलवर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना ऍडलेड येथे झाला होता. हा सामना भारताने आजच्याच दिवशी म्हणजे 10 डिसेंबर 2018ला जिंकत मोठा पराक्रम केला होता.

6 डिसेंबर 2018 ला सुर झालेला हा सामना भारताने 10 डिसेंबर म्हणजे सामन्याच्या पाचव्या दिवशी 31 धावांनी जिंकला होता. त्यावेळी भारताने तब्बल 10 वर्षांच्या अंतराने ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम केला होता.

त्या विजयापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियात 2008 मध्ये पर्थला झालेला कसोटी सामना जिंकला होता. विशेष म्हणजे 2008मध्ये जो भारतीय संघ विजयी झाला होता त्यातील केवळ इशांत शर्मा हा एकमेव खेळाडू 10 वर्षांनंतरही भारतीय संघात होता.

भारताने ऍडलेड कसोटीनंतर पुढे ऑस्ट्रेलिया विरुद्धची ही 4 सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती आणि ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---