आज अर्जुन रणतुंगा यांनी कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळली. आजकाल श्रीलंकेचा हा माजी कर्णधार रोज नवनवीन वक्तव्यांमुळे चर्चेत असतो.
कधी श्रीलंकेच्या संघावरील टीकेमुळे तर कधी विराट कोहलीच्या तंत्रावरील चर्चेमुळे. अशा या खेळाडूच्या नावावर देशासाठी खेळताना अनेक विक्रम जमा झाले आहेत. परंतु एक खास असा विक्रम आहे जो इतर कोणत्याही खेळाडूच्या नावावर नाही.
श्रीलंका संघ १९८२ साली पहिला कसोटी सामना खेळाला होता. त्या संघाचा अर्जुन रणतुंगा एक महत्त्वाचा भाग होता. त्यांनतर जेव्हा श्रीलंका संघ हा जून २००० साली १००वा कसोटी सामना खेळली. विशेष म्हणजे या संघातही अर्जुन रणतुंगा होते. एखाद्या संघाने खेळलेल्या पहिल्या आणि शंभराव्या कसोटीमध्ये त्याच खेळाडूने खेळण्याची ही इतिहासातील केवळ पहिली आणि शेवटची वेळ होती.
संघाने जेव्हा १००वा कसोटी सामना खेळला तेव्हा ती रणतुंगा यांची ८८वी कसोटी होती. त्यानंतर त्यांनी आणखी ५ कसोटी सामने खेळून ऑगस्ट २००० मध्ये निवृत्ती घेतली.