सन २००१ ला ऑस्ट्रेलिया संघ भारतात ३ कसोटी व ५ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता. कसोटी मालिकेत भारताने शानदार २-१ असा विजय मिळवला. राहुल-लक्ष्मण जोडीने शानदार फलंदाजी करुन जिंकलेला कोलकाता कसोटी सामना याच मालिकेतील.
वनडे मालिकेत पहिल्या दोन सामन्यानंतर मालिका १-१ अशी बरोबरीत होती. तिसरा सामना इंदोर येथे झाला. तत्पुर्वी पुणे येथील वनडे सामन्यातच सचिनला वनडेत १० हजार धावा करणारा खेळाडू होण्याची संधी होती. पुणे वनडेत जर सचिनने ६६ धावा केल्या असत्या तर सचिनच्या वनडेतील १० हजार धावा पुण्यातील नेहरु स्टेडियमवरच झाल्या असत्या. परंतु सचिन ३२ धावांवर बाद झाला. त्याला डॅमियन फ्लेमिंगने डॅरेन लेहमनकडे झेल द्यायला भाग पाडले.
त्यामुळे पुणे वनडेनंतर सचिनच्या नावावर वनडेत २६५ वनडे सामन्यांत २५८ डावांत ४२.२२च्या सरासरीने ९९६६ धावा होत्या व शतके होती २७. यामुळे इंदोर वनडेला दोन अर्थांनी मोठे महत्त्व आले होते. भारताला मालिकेत २-१ने आघाडी व सचिनच्या १० हजार धावा.
ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव स्मिथने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पुणे वनडे गांगुलीबरोबर सलामीला आलेला सचिन या वनडेत राहुल द्रविडबरोबर फलंदाजीला आला. राहुलने केवळ १५ धावा करत तंबूचा रस्ता पकडला.
व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण सोबत सुरेख भागीदारी रचताना शेन वाॅर्नच्या चेंडूवर ड्राईव्ह करत सचिनने एक धाव घेतली. ही वनडे क्रिकेटमधील सचिनच्या कारकिर्दीतील १० हजारांवी धाव होती. याबरोबर सचिनचे व इंदोरचे नाव इतिहासात जोडले गेले. सचिन पृथ्वीवरील पहिला खेळाडू ठरला त्याने वनडेत १० हजार धावांचा टप्पा पार केला. Sachin Tendulkar becomes first batsman to score 10000 ODI runs. भारताने हा वनडे सामना जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. सचिनलाच या सामन्यात सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
याच सामन्यात सचिनने १२५ चेंडूत १३९ धावांची खेळी केली. सचिनची ही वनडेतील २८वी शतकी खेळी ठऱली. या वनडेनंतर सचिनच्या वनडे कारकिर्दीत २६६ सामन्यात ४२.६३च्या सरासरीने १०१०५ धावा जमा झाल्या होत्या. त्यावेळी सचिननंतर वनडेत सर्वाधिक धावा या मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर होत्या. त्याने वनडेत ३३४ सामन्यात ९३७८ धावा केल्या होत्या.
त्यानंतर २४ वर्ष क्रिकेटवर अधिराज्य गाजविलेल्या या क्रिकेटरने वनडेत ४६३ सामन्यात ४४.८३च्या सरासरीने १८४२६ धावा केल्या. आजही हा विक्रम सचिनच्या नावावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जिंकली बेंगलोर पण चर्चा कोलकाताच्या हुकमी गोलंदाजाची, IPL इतिहासात नोंद होणारा केला रेकॉर्ड