बुधवारी (11 डिसेंबर) वानखेडे स्टेडियम मुंबई (Wankhede Stadium Mumbai) येथे भारत विरुद्ध विंडीज (India vs Windies Match) संघात झालेल्या अंतिम टी20 सामन्यात भारताने 67 धावांनी विजय (Won By 67 Runs) मिळवला. तसेच मालिकाही 2-1ने खिशात घातली.
या सामन्यात रिषभ पंतला (Rishabh Pant) चांगली कामगिरी करता आली नाही. तो शुन्य धावेवर बाद झाला.
रिषभ पंतला मागील काही महिन्यांपासून टीकांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर त्याच्या यष्टीरक्षण आणि फलंदाजीवर टीका होत आहे. तसेच त्याने यष्टीमागे घेतलेल्या चूकीच्या निर्णयांमुळेही त्याच्यावर टीका होत आहेत.
रिषभ पंतवर टीका झाल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) पंतला त्याला पाठिंबा दिला आहे.
या क्रिकेटपटूंनंतर भारताचे प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला पाठिंबा देताना म्हणाले की, त्याच्याकडे खूप कौशल्य आहे. पंतने एकदा धावा करण्यास सुरुवात केले तर तो एक मोठा खेळाडू होईल.
आता भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात रविवारी (15 डिसेंबर) 3 सामन्यांच्या वनडे (ODI Series) मालिकेतील पहिला वनडे सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (Chinnaswamy Stadium) होईल.
“आम्ही त्याच्याविषयी (पंत) चर्चा करत आहोत. कारण, त्याच्यात बरीच क्षमता आहे आणि प्रत्येक संघातील प्रत्येकाचा असा विश्वास आहे की तो कोणत्याही संघाचा एक्स फॅक्टर असू शकतो,” असे सामन्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी राठोड पत्रकार परिषदेत म्हणाले.
“निवडकर्ता आणि संघ व्यवस्थापनाने त्याला पाठिंबा दर्शविला आहे. कारण तो एक चांगला खेळाडू आहे असा आमचा सर्वांचा विश्वास आहे. एकदा त्याने धावा करण्यास सुरवात केली की मला खात्री आहे की तो एक मोठा खेळाडू होईल,” असेही राठोड म्हणाले.
https://twitter.com/Maha_Sports/status/1205491389485604864
https://twitter.com/Maha_Sports/status/1205479939396341768






