---Advertisement---

धोनीशी तुलना नकोच! खासदार शशी थरूर यांच्या प्रतिक्रियेवर संजूचं रोखठोक मत

On: बुधवार, सप्टेंबर 30, 2020 10:55 AM
---Advertisement---

यंदा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघ चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. या संघाने झालेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी चेन्नई सुपर किंग्स ला मात दिली तर दुसऱ्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने दिलेले 224 धावांचे मोठे लक्ष्य तीन चेंडू शिल्लक ठेवून गाठले.

या दोन्ही सामन्यात राजस्थानचा युवा खेळाडू संजू सॅमसन याने त्याच्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. केवळ क्रिकेट क्षेत्रातीलच नाही तर राजकारणातील नेतेही त्याची प्रशंसा करत आहेत. काही दिवसापूर्वी केरळमधील काँग्रेस पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी त्याची तुलना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीशी केली होती. तर माजी क्रिकेटपटू व भाजप पक्षाचा खासदार गौतम गंभीर शशी थरूर यांच्याशी सहमत नव्हता. आता स्वत: संजू सॅमसन यानेच याबद्दल भाष्य केले आहे.

धोनीशी केलेली तुलना फेटाळली

सॅमसनने शशी थरूर यांनी केलेली तुलना फेटाळून लावत म्हटले की, “मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की धोनीसारखे कोणीही खेळू शकत नाही किंवा त्याच्यासारखा खेळण्याचा प्रयत्न कोणी करू नये. एमएस धोनीसारखे खेळणे सोपे नाही, मी कधी धोनीसारखा खेळण्याचा विचार करत नाही. तो भारतीय क्रिकेटचा एक अनुभवी खेळाडू आहे.”

सामना जिंकून देण्याचा करतो विचार

पुढे बोलताना तो म्हणाला, “मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करतो, मी काय करू शकतो, उत्कृष्ट कामगिरी कशी करू करतो आणि सामना कसा जिंकू शकतो याचा विचार मी करतो.”

आयपीएलवर लक्ष केंद्रीत करतोय

सॅमसनच्या आयपीएलमधील या कामगिरीमुळे भारतीय संघात स्थान मिळविण्याच्या दाव्याला बळकटी मिळाली आहे. राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधण्यासाठी आपण पुरेसे काम केले आहे का असे विचारले असता विचारले सॅमसन म्हणाला, “मी या प्रश्नावर हो आणि नाही हे दोन्ही उत्तर देईल. मी चांगल्या लयीत आहे हे मला माहित आहे. संघाला सामना जिंकवून देणे हेच माझे स्वप्न आहे. सध्या मी आयपीएलवर लक्ष केंद्रीत करत आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---