भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. क्रिकेटमधील नियमांची त्याला सर्वाधिक जाणही आहे, हे अनेकदा दिसले आहे. क्रिकेटमध्ये मंकडींग करणे बरोबर की चूक यावर वाद होते. त्यावर काही संघांनी अंकुशही लावला होता. त्यातच त्याने क्रिकेटच्या एका नियमात बदल करण्याचे सुचविले आहे. तसेच वनडे क्रिकेटचे भवितव्य धोक्यात असल्याने मत मांडत त्याने केलेल्या विधानांनीही नवीन वादाला सुरूवात झाली आहे.
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने वनडे क्रिकेटचे भविष्य धोक्यात असल्याचे मत व्यक्त केले आहे. “मागील काही सामने पाहता वनडे क्रिकेटला टी२०चे स्वरूप प्राप्त होत आहे. जागतिक क्रिकेटमध्ये द्विपक्षीय वनडे मालिका कमी होत चालल्या आहेत,” असेही त्याने म्हटले आहे. त्याच्या आधी भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी अशा मालिका न खेळता अधिक टी२० लीग खेळल्या पाहिजेत असे विधान केले होते.
अश्विन ‘वानी एंड टफर्स क्लब पॉडकास्ट’मध्ये बोलत होता. “सध्याचा काळ पाहता वनडे क्रिकेटला स्वत:चे महत्व सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. वनडे क्रिकेट हे चांगले असून त्यात अन्य क्रिकेटप्रकारासारखे बदल दिसत नव्हते. यामध्ये गोलंदाज प्रमुख भुमिका निभावत होते,” असेही त्याने पुढे म्हटले आहे.
“सध्याच्या वनडेमध्ये दोन नवीन चेंडू घेतले जातात. यामध्येही बदल करण्याची गरज असून जुन्या काळात जसे होते तसे करण्याची गरज आहे. आधीच्या सामन्यांमध्ये एकाच चेंडूचा वापर केला जायचा. आताही एका चेंडूचा वापर केला असता सामना बरोबरीचा होतो. सामन्यासाठी आवश्यक अशी रिवर्स स्विंगही मिळते,” असे अश्विनने म्हटले आहे.
अश्विनने त्याच्या यू ट्यूब चॅनेलमध्ये पायचीत नियम आणि फलंदाजांच्या स्विच हीट शॉटबद्दल म्हटले, “पायचीतच्या नियमांमध्येही बदल करण्यात यावा. जेव्हा फलंदाज स्विच हीट शॉट मारताना चेंडू सोडतो तेव्हा त्या फलंदाजांला बाद दिले पाहिजे.” यावेळी त्याने रुट आणि बेयरस्टोचे उदाहरण देत म्हटले, “त्या दोघांनी एका डावात १० असे शॉट्स खेळले तर ९ वेळा ते स्विचशॉट खेळू शकले नाही अशामध्ये त्यांना ९ वेळा बाद करण्याची संधी होती.”
अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही फलंदाजाला मंकडिंग केले नाही. त्याने आयपीएलमध्ये जोस बटलरला असे बाद केले होते, त्यावरून खूप वाद झाले होते. मात्र मेरिलबन क्रिकेट क्लब (एमसीसी) यांनी त्याने घेतलेली विकेट वैध आहे असे स्पष्ट केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: टीम इंडियाला मिळाला एक नवा फिरकीपटू, इंग्लंडमध्ये दाखवतोयं आपले कौशल्य