मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघाचं आयपीएल 2025 (IPL 2025) च्या अंतिम सामन्यात खेळण्याचं स्वप्न धुळीला मिळालं आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab kings vs mumbai indians) मुंबईला 5 विकेट्सने पराभूत करत 11 वर्षानंतर अंतिम सामन्यात धडक मारली आहे. श्रेयसने शानदार फलंदाजी करत मुंबईच्या संघाकडून विजय हिसकावून घेतला आहे. श्रेयसने 41 चेंडूत 87 धावा करत, 5 चौकार आणि 8 षटकार झळकावले.
ट्रेंट बोल्टची (Trent Boult) एक चूक मुंबई इंडियन्सला चांगलीच महागात पडली, म्हणजेच श्रेयस (Shreyas iyer) आणि नेहाल वडेराने (Nehal wadhera) मिळून चौथ्या विकेटआधी 84 धावांची भागीदारी केली होती. पण जेव्हा नेहाल 13 धावांवर खेळत होता. तेव्हा बाउंड्री लाईनवर बोल्टने त्याचा सोपा कॅच सोडला आणि हाच सोपा झेल मुंबई इंडियन्सला महागात पडला. नेहालने 29 चेंडूत 48 धावा केल्या आणि श्रेयस सोबत मिळून मुंबईकडून हा सामना दूर नेला.
याच सोबत श्रेयस अय्यर अजून एक कारनामा त्याच्या नावावर केला आहे. तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएलच्या फायनल सामन्यात पोहोचवणारा श्रेयस अय्यर इतिहासातील एकमेव कर्णधार ठरला आहे.






