गुजरात टायटन्सविरुद्धच्या क्वॉलिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सचा खेळाडू टिम डेविड याने केलेली एक चूक संघाला चांगलीच महागात पडली. डेविडच्या या चुकीमुळेच मुंबईला अंतिम सामन्यात पोहोचता आले नाही, असेही म्हणता येऊ शकते. गुजरातच्या विजयात शुबमन गिलचे योगदान सर्वात मोठे होते. गिलने 129 धावांची वादळी खेळी केली. पण टिम डेविडने ती चूक केली नसती, तर गिल खूपच स्वस्तात बाद होऊ शकत होता.
इंडियन प्रीमियर लीग 2023चा दुसरा एलिमिनेटर सामना शुक्रवारी (26 मे) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला 62 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबईला मिळालेल्या पराभवाचे खापर चाहत्यांकडून टीम डेविड (Tim David) याच्या माधी फोडले जात आहे. मुंबई इंडियन्सला टिम डेविडने सोडलेल्या झेलची किंमत 99 धावांनी मोजावी लागली. हा झेल होता शुबमन गिल (Shubman Gill) याचा.
गुजरात टायटन्सच्या डावातील सहाव्या षटकात ख्रिस जॉर्डन गोलंदाजी करत होता. षटकातील पावचा चेंडू शुबमनने मिड ऑनच्या दिशेने मारला. त्याठिकाणी उभ्या अशलेल्या डेविडकडे झेल पकडण्याची चांगली संधी होती. पण तरीदेखील डेविडच्या हातून झेल सुटला. यावेळी शुबमन गिल अवघ्या 30 धावांसह खेळपट्टीवर खेळत होता. डेविडने जर हा झेल पकडला असता, तर गिलच्या 129 धावाही झाल्या नसत्या आणि गुजरातला 233 धावांचा टप्पाही गाठता आला नसता.
https://twitter.com/jeffrey_masooq/status/1662120062206230530?s=20
डेविडने केलेल्या या चुकीचा गिलने पुरेपूर फायदा घेतला आणि हंगामातील आपले तिसरे शतक ठोकले. अवघ्या 60 चेंडूत त्याने 129 धावा कुटल्या. यात 10 चौकार आणि 7 चौकार होते. मुंबईला विजयासाठी गुजरातकडून 234 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण मुंबईचा संपूर्ण संघ 18.2 षटकांमध्ये 171 धावा करून सर्वबाद झाला. सूर्यकुमार यादव मुंबईसाठी सर्वोत्तम प्रदर्शन करू शकला. सूर्याने 38 चेंडूत 61 धावांचे योगदा नदिले. त्याचसोबत तिलक वर्माने अवघ्या 14 चेंडूत 43 धावा कुटल्या. मुंबईला सर्वबाद करण्यासाठी गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याचे योगदान सर्वात महत्वाचे ठरले. मोहितने 2.2 षटकात 10 धावा खर्च करून संघासाठी सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. (One mistake of Tim David, Mumbai canceled the ticket to the final! A price of 99 runs had to be paid)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-