---Advertisement---

गुरु हरपला! विराट कोहलीला फलंदाजीचे धडे देणारा प्रशिक्षक काळाच्या पडद्याआड

On: शनिवार, मे 22, 2021 10:02 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या प्रतिभेच्या जोरावर फार कमी काळात भारतीय क्रिकेटजगतात मोठे नाव कमावले आहे. त्याच्या या यशामागे अनेक व्यक्तींचा मोठा हात आहे. त्या व्यक्तींपैकी एक असणारे विराटचे बालपणीचे प्रशिक्षक सुरेश बात्रा यांचे गुरुवारी (२० मे) निधन झाले आहे. ते ५३ वर्षांचे होते.

विराट दिल्ली क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत असताना त्याचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांचे साहाय्यक प्रशिक्षक म्हणून सुरेश बात्रा कार्यरत होते. बात्रा यांच्या मृत्यूची माहिती वरिष्ठ क्रिडा पत्रकार विजय लोकापल्ली यांनी दिली आहे.

‘विराट कोहलीचे लहाणपणीचे प्रशिक्षक सुरेश बात्रा यांनी गुरुवारी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांनी रोजनिशीप्रमाणे गुरुवारी सकाळी देवपुजा उरकली. त्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ५३ वर्षांचे होते,’ असे लोकापल्ली यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर लिहिले आहे.

https://twitter.com/vijaylokapally/status/1395771345254850561?s=20

याबरोबरच विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी बात्रा यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. ‘मी माझा लहाना भाऊ गमावला. त्याला मी १९८५ पासून ओळखत होतो,’ असे त्यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/Sahil_Malhotra1/status/1395331072770994178?s=20

विराट ९ वर्षांचा असल्यापासून राजकुमार शर्मा आणि सुरेश बात्रा यांचे प्रशिक्षण त्याला लाभले होते. विराटची कारकिर्द घडवण्यात त्यांच्या मोलाचा वाटा राहिला आहे. याबरोबरच २०१८ सालच्या १९ वर्षांखालील विश्वविजेत्या संघाचा खेळाडू मनज्योत कालरा यालाही बात्रा यांनी प्रशिक्षण दिले होते. मनज्योतने या विश्वचषक अंतिम सामन्यात शतक झळकावले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तानचा एक असा कर्णधार, ज्याचे आजोबा उत्तर प्रदेशमधून झाले होते ग्रामपंचायत सदस्य

सत्तरच्या दशकात ‘या’ भारतीय फिरकीपटूची होती भलतीच दहशत, आजही विक्रम आहेत अबाधित

पंत आणि साहामध्ये जागेसाठी टक्कर; वृद्धिमान साहा म्हणतो, “टीम इंडियाची पहिली पसंती मला…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---