इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 16वा हंगाम यावर्षी खेळला जात आहे. चालू आयपीएल हंगाम सध्या रमोंचक वळणावर आहे. लवकरच प्लेऑफचे चार संघ निश्चित होतील. लीगमध्ये खेळणारा प्रत्येक संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएलसारख्याच इतर लीग्जविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या मते जगभरात आयपीएलसारख्या टी-20ची लीगची संख्या वाढत चालली आहे. यामुळे शक्यतो वनडे क्रिकेटला अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण फ्रँचायझी दीर्घ खाळासाठी खेळाडूंना करारबद्द करण्याच्या प्रयत्नात आहेत. शास्त्रींच्या मते क्रिकेट देखील फुटबॉलच्या मार्गावर आहे. भविष्यात क्रिकेटपटू फक्त जागतिक पातळीवरील महत्वाच्या स्पर्धांमध्येच सहभाग नोंदवतील, असेही शास्त्रींना वाटते.
शास्त्री ईएसपीएन क्रिकइंफोवर म्हणाले, “मी नेहमीच म्हणत आलो आहे ही, यामुळे द्विपक्षीय मालिकांचे नुकसान होईल. जगभरात लीग्जची संख्या ज्या पद्धतीने वाढत चालली आहे, त्यावरून असे वाटते की, क्रिकेट फुटबॉलच्या मार्गावर आहे. सर्पूर्ण संघ विश्वचषकाच्या आदी एकत्र येईल आणि थोडेफार द्विपक्षीय क्रिकेट खेळले जाईल. मला यात काहीच गैर वाटत नाही, पम वनडे क्रिकेटचे नुकसान होईल.”
आंतरराष्ट्रीय खेळाडू देशासाठी खेळण्याऐवजी फ्रँचायझी क्रिकेटला महत्व देतात. याविषयी शास्त्री म्हणाले, “देशात एक कोटी 40 कोटी लोक आहेत, पण खेळता फक्त 11 खेळाडू. मग बाकीचे खेळाडू काय करणार? अशा फ्रँचायझी क्रिकेटमध्ये त्यांना जगभरात खेळण्याची संधी मिळत आहे. अशात त्यांनी या लीगमध्ये का खेळू नये? हा त्यांचा कमाईचा स्त्रोत आहे.” (‘Only 11 players can play for the country…’, Ravi Shastri’s big statement during IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘ब्रायन लारांनी मला सांगितलं की, मी कसोटी खेळाडू आहे…’, आयपीएलदरम्यान हॅरी ब्रुकचा खुलासा
‘रोहितने त्याचे नाव No Hit Man ठेवले पाहिजे’, शून्यावर बाद होताच मुंबईच्या कॅप्टनवर भडकला भारतीय दिग्गज