क्रिकेट आणि विक्रम ही आता नित्याचीच बाब झाली आहे. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात ८ फेब्रुवारी २०१८रोजी दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशसंघाकडून एक खास विक्रम झाला होता.
या कसोटी सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. गोलंदाजी करत असलेल्या बांगलादेशकडून पहिली दोन्ही षटके फिरकी गोलंदाजांनी टाकली होती.
अब्दूर रझाक आणि मेहीडी हसन या दोन फिरकी गोलंदाजांनी बांगलादेशाकडून डावाची सुरुवात केली. १४० वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सामन्याची पहिली दोन षटके फिरकी गोलंदाजाने टाकायची ही केवळ दुसरी वेळ होती.
विशेष म्हणजे हा निर्णय योग्य ठरवताना अब्दूर रझाकने १४ षटकांत ५९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.
यापूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कानपुर कसोटीत १९६४ साली भारताकडून सामन्यातील पहिली दोन षटके ही फिरकी गोलंदाजांनी टाकली होती. एम जयसिंम्हा व सलीम दुराणी हे ते दोन गोलंदाज होते.
ट्रेंडिंग घडामोडी –
षटकार- चौकार मारले म्हणून एमएस धोनी झाला होता नाराज
भारतीय खेळाडू देशासाठी नाही तर स्वत: साठी खेळतात
टाॅप बातम्या: ५ अशा बातम्या ज्यांची क्रिकेटवर्तुळात आज आहे मोठी चर्चा






