जगातील सर्वात मोठ्या आतंकवादी हल्ल्यांपैकी एक म्हणून २००१ मधील अमेरिका येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला ओळखला जातो. कुख्यात आतंकवादी संघटना अल कायदाने केलेल्या या हल्ल्यात दोन हजारपेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. नुकतीच या हल्ल्याला २१ वर्ष पूर्ण झाली. या अत्यंत निंदनीय हल्ल्यात एक क्रिकेटपटू देखील प्राणास मुकला होता.
सर्वात मोठ्या हल्ल्यास झाली दोन दशके पूर्ण
कुविख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेन याची आतंकवादी संघटना असलेल्या अल कायदाने दोन विमानांचे अपहरण करत ही विमाने ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात स्थित असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींना धडकवली होती. या आतंकवादी हल्ल्यात २,९७७ लोकांना आपले प्राण गमवावे लागलेले. हा हल्ला अमेरिकेच्या आणि जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आतंकवादी हल्ल्यांपैकी एक मानला जातो.
Nezam Hafiz was a talented cricket player, a member of the U.S. cricket team and captain of the American Cricket Society. On 9/11, he was at work on the North Tower's 94th floor. This bat was used in a memorial game played in his honor. #911Museum https://t.co/ddmWThu0uR pic.twitter.com/TkcIiqFoy3
— 9/11 Memorial & Museum (@Sept11Memorial) January 29, 2018
या क्रिकेटपटूला गमवावा लागला होता जीव
या हल्ल्यामध्ये जे लोक मृत्युमुखी पडले त्यामध्ये एका क्रिकेटपटूचा देखील समावेश होता. तत्कालीन अमेरिकन क्रिकेट संघाचा उपकर्णधार नेझम हफीज याला या दुर्देवी हल्ल्यात मरण आलेले. हफीज नॉर्थ टॉवरच्या ९४ व्या मजल्यावर काम करत. हफीजला अमेरिकन क्रिकेटचे भविष्य आणि भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जात होते.
अशी राहिली कारकीर्द
मृत्युसमयी ३२ वर्षाचा असलेल्या हफीज याचा जन्म २१ एप्रिल १९६९ रोजी हॉल येथे झाला होता. त्याने आपला मूळ देश असलेल्या गयानासाठी वयोगट स्पर्धा खेळल्या होत्या. लेवर्ड आइसलँड संघासाठी एकोणीस वर्षाखालील क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने अत्यंत कमी कालावधीत भरीव कामगिरी केली होती. त्याने प्रथमता ज्यावेळी गयानाच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते, त्यावेळी विरुद्ध त्रिनिदाद आणि टोबॅगो संघाचा कर्णधार दिग्गज ब्रायन लारा होता.
अमेरिकेने २००१ कॅनडा दौऱ्यासाठी त्याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती केलेली. आपल्या छोट्याशा कारकीर्दीत त्याने ६ प्रथमश्रेणी व ३ लिस्ट ए सामने खेळलेले. अमेरिकेने २००४ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. या स्पर्धेमध्ये हफीज खेळताना दिसू शकला असता. मात्र, या भीषण हल्ल्यामुळे अमेरिकेला आपला एक गुणवान क्रिकेटपटू गमवावा लागला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाचे-
दुसऱ्या काळात जन्मला असता, तर तो भारताचा अव्वल फिरकीपटू असता
हेअरबँड घालून ऑस्ट्रेलियाला दोन-दोन विश्वचषक जिंकून देणारा दुर्लक्षित शिलेदार