पोर्ट ऑफ स्पेन। वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (14 ऑगस्ट) क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला.
या विजयात भारताचा कर्णधार विराट कोहलीने 114 धावांची नाबाद शतकी खेळी केली, तर श्रेयस अय्यरने 65 धावांची अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. याबरोबरच अय्यरने एक खास विक्रमही या सामन्यात केला आहे.
24 वर्षीय अय्यरने 41 चेंडूत 65 धावांची खेळी करताना 3 चौकार आणि 5 षटकार मारले. त्यामुळे तो वेस्ट इंडीजमध्ये खेळताना वेस्ट इंडीज विरुद्धच्या एका वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आहे. युवराजने सबिना पार्क, किंगस्टन येथे 26 जून 2009 ला वेस्ट इंडीज विरुद्ध खेळताना 7 षटकार मारले होते. त्याचबरोबर 131 धावांची शतकी खेळी केली. होती.
बुधवारी झालेल्या वेस्ट इंडीड विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत पावसाच्या व्यत्ययामुळे वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना 35 षटकात 7 बाद 240 धावा केल्या होत्या. तसेच भारताला डकवर्थ लूईस नियमानुसार 35 षटकात 255 धावांचे आव्हान देण्यात आले होते.
या आव्हानाचा पाठलाग भारताने 32.3 षटकात पूर्ण केला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून विराट आणि श्रेयसने चौथ्या विकेटसाठी 120 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
वेस्ट इंडीज विरुद्ध वेस्ट इंडीजमध्ये एका वनडेत सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय –
7 षटकार – युवराज सिंग (26 जून 2009, किंगस्टन)
5 षटकार – श्रेयस अय्यर (14 ऑगस्ट 2019, पोर्ट ऑफ स्पेन)
4 षटकार – विराट कोहली (25 जून 2017, पोर्ट ऑफ स्पेन)
3 षटकार – कपिल देव (29 मार्च 1983, एल्बिनो स्पोर्ट्स कॉम्पेक्स)
3 षटकार – विरेंद्र सेहवाग (23 मे 2006, बॅसेटर(वॉर्नर पार्क))
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–या दिग्गज कर्णधारांच्या यादीत आता विराट कोहलीचे नाव सन्मानाने घेतले जाणार!
–टॉप ५: ‘रनमशीन’ विराट कोहलीने शतकी खेळी बरोबरच केले हे खास ५ विक्रम
–धावांचा रतीब घालणारा स्मिथ मैदानाबाहेर या कारणामुळे झाला करोडपती






