वनडे क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त फलंदाज वेगाने धावा करण्याचा प्रयत्न करतात. अनेक फलंदाजांनी वनडेत जबरदस्त कामगिरी करत अनेक विक्रमांची सांगड घातली आहे. यामध्ये वनडेत शून्यावर बाद होण्याच्या नकोश्या विक्रमाची देखील नोंद झाली आहे. हा विक्रम श्रीलंकाचा दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. तो वनडेत सर्वाधिक ३४ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
तर, तब्बल १७ फलंदाजांच्या नावावर वनडेत २० किंवा २०पेक्षा जास्तवेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम आहे. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे. तो २०वेळा वनडेत शून्यावर बाद झाला आहे.
परंतु, याउलट जर वनडे कारकिर्दीत एकदाही शून्यावर बाद न होण्याऱ्या फलंदाजांविषयी पाहायचे झाले, तर असे खूप कमी फलंदाज मिळतील. वनेडत सर्वाधिक डाव खेळून एकदाही शून्यावर बाद न होण्याचा विक्रम ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाचा माजी क्रिकेटपटू केप्लर वेसेल्सच्या नावावर आहे. तो १०९ सामन्यातील १०५ डावात खेळून एकदाही शून्यावर बाद झालेला नाही. वनडेत १००पेक्षा जास्त डाव खेळून एकदाही शून्यावर बाद न होणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे.
जर, वनडेत २०पेक्षा जास्त डावात एकदाही शून्यावर बाद न होणाऱ्या भारतीय खेळाडूंविषयी पाहायचे झाले तर, असा फक्त एक भारतीय क्रिकेटपटू आहे. तो म्हणजे यशपाल शर्मा. शर्मा यांनी त्यांच्या ७ वर्षांच्या वनडे कारकिर्दीत ४२ सामन्यात ४० डावांत फलंदाजी केली आहे. दरम्यान त्यांनी ४ अर्धशतके करत एकूण ८८३ धावा केल्या होत्या.
१९७८मध्ये सियालकोट येथील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण करणाऱ्या शर्मा यांनी १९८५ला इंग्लंडविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला. दरम्यान ते १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग होते. त्यांनी साखळी फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध ८९ धावांची खेळी केली होती. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना सामनावीर पुरस्कारदेखील मिळाला होता. शिवाय, इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत शर्मा यांनी ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
मुंबई न्यूझीलंडच्या लोकसंख्येची तुलना करणाऱ्याला ‘या’…
हा खेळाडू म्हणतोय, टीम इंडियात माझी जागा पक्की
एका आयपीएल हंगामात तब्बल १००० मिनीटं फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज