---Advertisement---

मुंबई न्यूझीलंडच्या लोकसंख्येची तुलना करणाऱ्याला ‘या’ क्रिकेटरने दिले उत्तर

On: मंगळवार, जून 9, 2020 12:17 PM
---Advertisement---

मुंबई । जागतिक क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत जे सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय असतात. गमतीशीर पोस्ट करून नेहमी चर्चेत राहतात. कधी कधी क्रिकेट फॅन्सला देखील प्रत्युत्तर देतात. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिम्मी नीशम त्यापैकीच एक.

नुकतेच न्यूझीलंड हा देश कोरोना मुक्त झाला आहे. कोरोना मुक्त झाल्यानंतर जिम्मी निशमने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आपला देश कोरोनामुक्त कसा झाला हे देखील सांगितले.

जिम्मी निशमचा या ट्विटनंतर, एका भारतीय फॅन्सने कमेंट करत लिहले की, “तुमची लोकसंख्या चाळीस लाख आहे. मुंबईची लोकसंख्या न्यूझीलंडपेक्षाही जास्त.” क्रिकेट फॅन्सची ही कमेंट्स नीशमला अजब वाटली. भारतीय क्रिकेट फॅन्सच्या या कमेंटला त्याने प्रत्युत्तर दिले. निशमने एक जीआयएफ पोस्ट केले, ज्यात एक व्यक्ती थम्स अप करताना दिसून आला.

क्रिकेट फॅन्सच्या कमेंट्समध्ये देखील सत्यता आहे. मुंबईची लोकसंख्या न्यूझीलंडच्या तिप्पट आहे. मुंबई हे कोरोनाने सर्वाधिक प्रभावित असलेले शहर आहे. न्यूझीलंड देशाने कोरोना मुक्त झाल्याचे घोषित केले आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा अर्डेन यांनी घोषित केले की, “आमचा देश लेवल एक अलर्ट पासून पुढे जाईल. आता लग्न, अंतिम संस्कार आणि ट्रान्सपोर्ट यावर कोणतेच बंधने नसतील.

“मोठमोठे योजना, दृढनिश्चय आणि टीमवर्कमुळे या महामारीतून आमचा देश कोरोना मुक्त झाला असल्याचे जिमी निशम यांनी सांगितले.” कमी लोकसंख्येमुळे हा देश लवकर कोरोनाच्या संकटातून सुटला. वास्तविक पाहता, न्यूझीलंडची लोकसंख्या पन्नास लाखांपेक्षा पण कमी आहे. त्यामुळे येथे आरोग्याच्या सोयी सुविधा पुरवणे सहज शक्य झाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---