---Advertisement---

क्रिकेटमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा राहुल द्रविड एकमेव क्रिकेटपटू

---Advertisement---

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 509 सामने खेळणाऱ्या ‘द वॉल’ ऱाहुल द्रविडने भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. ज्याच्या आठवणी आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत.

त्याने त्याच्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत 48 शतकांसह 24208 धावा केल्या. तसेच अनेक विक्रमही केले आहेत. पण असा एक विश्वविक्रम आहे, जो केवळ त्याच्या नावावर आहे; तो म्हणजे वनडेमध्ये त्याने 2 वेळा आपल्या साथीदाराबरोबर 300 किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या भागीदारी केली आहे.

आत्तापर्यंत कोणालाही वनडेत 2 वेळा 300 किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या भागीदारी करता आलेली नाही.

वनडेमध्ये आत्तापर्यंत कोणत्याही विकेटसाठी केवळ 5 वेळाच 300 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी झाली आहे. त्यातही दोन भागीदाऱ्यांमध्ये द्रविडचा समावेश आहे.

द्रविडने पहिल्यांदा 26 मे 1999 ला सौरव गांगुलीबरोबर 1999 च्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध वनडेत 318 धावांची भागीदारी रचली होती. त्या सामन्यात द्रविडने 145 धावा केल्या होत्या. तर गांगुलीने 183 धावा केल्या होत्या.

त्यानंतर 6 महिन्यांनी द्रविडने 8 नोव्हेंबर 1999 ला सचिन तेंडूलकर बरोबर न्यूझीलंडविरुद्ध हैद्राबाद येथे 331 धावांची भागीदारी केली होती. त्यावेळी ही वनडेतील सर्वोत्तम भागीदारी ठरली होती. त्यानंतर हा विक्रम 2015 पर्यंत अबाधित होता. नंतर 2015 मध्ये ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्यूएल्सने झिम्बाब्वे विरुद्ध 372 धावांची भागीदारी करत हा विक्रम मोडला.

महत्त्वाच्या बातम्या-

फलंदाज म्हणून हिट; तर प्रशिक्षक म्हणून सुपरहिट, राहुल द्रविडच्या शिष्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अधिराज्य!

‘द्रविडची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड होणार असल्याची खेळाडूंना नव्हती कल्पना’, रोहितचा खुलासा

अजिंक्य रहाणेला १२ वर्षांपूर्वी ‘द वॉल’ राहुल द्रविडने दिला होता ‘हा’ लाखमोलाचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---