आजपासून(30 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सबिना पार्क, किंग्स्टन येथे सुरु होणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाने पहिल्या कसोटीत खेळवलेला 11 जणांचा संघच कायम ठेवला आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सलग दोन कसोटीमध्ये भारताच्या 11 जणांच्या संघात एकही बदल न होण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे.
याआधी मागील वर्षी भारताच्या इंग्लंड दौऱ्यात ट्रेंट ब्रिज आणि साऊथँम्पटनला झालेल्या अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत विराटने 11 जणांचा सारखाच संघ खेळवला होता.
वेस्ट इंडीज विरुद्ध सुरु असलेली भारताची 2 सामन्यांची ही कसोटी मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपचाही भाग आहे. या मालिकेत भारताने पहिल्या कसोटीत विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 60 गुण मिळवले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
–अंबाती रायडूने निवृत्तीचा निर्णय घेतला मागे; ‘यांना’ दिले मन बदलण्याचे श्रेय






