२०१७ हे वर्ष अनेक स्टार खेळाडूंनी केलेल्या लग्नामुळे गाजले. यात विराट कोहली, झहीर खान, भुवनेश्वर कुमार यांचा समावेश होता. त्यामुळे आता भारतीय संघातील बहुतेक खेळाडू विवाहित आहेत.
मजेशीर गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पुढील महिन्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी आज रवाना झालेल्या १५ जणांच्या भारतीय संघात तीनच खेळाडू अविवाहित आहेत. यात केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या हे आहेत.
या तिघांपैकी राहुलला प्रेयसी आहे हे सर्वांना माहितीच आहे. परंतु हार्दिक आणि बुमराहबद्दल मात्र अजून तरी अशी काही माहिती नाही.
या दौऱ्यासाठी गेलेल्या भारतीय संघात तब्बल १२ खेळाडूंचे लग्न झाले आहे. यात यावर्षी कर्णधार कोहली आणि भुवनेश्वर यांनी लग्न केले आहे.
यावर्षी लग्न झालेल्या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाची बरीच चर्चा झाली. त्यांनी इटलीत हा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर दिल्ली आणि मुंबईत मोठे रिसेप्शन दिले. या रिसेप्शनला अनेक मोठमोठ्या मान्यवरांनी हजेरी लावली होती.