भारताचा ‘अ’ संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघात येत्या १८ जुलैपासून वनडे मालिका रंगणार आहे. २३ जुलै रोजी तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्याने ही मालिका संपेल. भारताचा धाकड सलामीवीर शिखर धवन या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्त्व करेल. कोणत्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्याची ही त्याची पहिलीच वेळ असेल. या नवनियुक्त कर्णधाराला श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत कर्णधार म्हणून बरेचसे विक्रम करण्याची संधी असेल.
तेंडूलकर, गांगुली, कोहलीची बरोबरी करण्याची संधी
भारत आणि श्रीलंका संघांनी १९८२ पासून आतापर्यंत बऱ्याचशा द्विपक्षीय वनडे मालिका खेळल्या आहेत. मात्र आतापर्यंत केवळ ३ भारतीय कर्णधार श्रीलंकेत वनडे सामन्यांमध्ये शतक करण्याचा किर्तीमान करू शकले आहेत. यामध्ये माजी कर्णधार सौरव गांगुली आणि सचिन तेंडूलकर यांचा समावेश आहे. तसेच भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली यानेही शतकी खेळी केली आहे.
यानंतर आता धवनकडे हा पराक्रम करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. त्याचा आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यातील फॉर्म पाहता त्याच्यासाठी ही गोष्ट अगदी सोपी वाटत आहे. जर त्याने श्रीलंकेविरुद्ध एकही शतक झळकावले तर गांगुली, तेंडूलकर आणि कोहली यांची बरोबरी करेल.
भारताकडून श्रीलंकेत गंभीरने केल्या आहेत सर्वोच्च धावा
याखेरीज एक फलंदाज म्हणूनही श्रीलंकेत अजून एका वनडे शतकाची आणि सर्वोच्च वैयक्तिक खेळीची त्याच्या खात्यात नोंद होईल. आतापर्यंत श्रीलंकेच्या मैदानावर सर्वोच्च धावांची वैयक्तिक खेळी करण्याच्या बाबतीत माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर अव्वलस्थानी आहे. त्याने २००९ मध्ये कोलंबो येथे सर्वाधिक १५० धावांची खेळी केली होती. त्याचा हा विक्रम अजूनही अबाधित आहे. त्याच्यानंतर तेंडूलकर १३८ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर प्रभारी कर्णधार धवन नाबाद १३२ धावांसह टॉप-३ मध्ये आहे.
श्रीलंकेत वनडे सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे टॉप-६ भारतीय फलंदाज:
गौतम गंभीर – १५० धावा
सचिन तेंडुलकर – १ ३८ धावा
शिखर धवन – नाबाद १३२ धावा
विराट कोहली – १३१ धावा
विराट कोहली – नाबाद १२८ धावा
सचिन तेंडुलकर – १२८ धावा
महत्त्वाच्या बातम्या-
विराट ब्रिगेडवर कोरोनाचं संकट, तरीही इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ आश्चर्यकारक निर्णय
चर्चा तर होणारच! भारतीय संघात कोरोनाचा प्रवेश झाल्याने चाहत्यांकडून आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया