भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा मोठ्या काळापासून कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेला नाही. पाठीवर झालेल्या शस्त्रक्रियानंतर तो आता आगामी आयपीएलला देखील मुकणार आहे. तसेच, पुनरागमनासाठी जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत वाट पहावी लागू शकते. मात्र, त्याच्या प्रकृतीबाबत अपडेट घेण्याची परवानगी केवळ दोनच व्यक्तींना असल्याची माहिती समोर येतेय.
बुमराह मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होत असलेल्या आयपीएलमधून पुनरागमन करण्याची चर्चा सुरू होती. मात्र, न्यूझीलंड येथे पार पडलेल्या शस्त्रक्रियेनंतर बुमराह याचे पुनरागमन लांबले आहे. याच कारणाने तो आयपीएल व त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळणार नाही. ऑगस्ट महिन्यात होऊ घातलेल्या आशिया चषकातही तो दिसणार की नाही याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
एका आघाडीच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बुमराहच्या एकूण स्थितीवर लक्ष ठेवण्याची अथवा त्याबाबत विचारपूस करण्याची परवानगी केवळ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण व संघाच्या फिजिओंना आहे. इतकेच नव्हे तर निवड समितीला देखील याबाबत कोणतीही माहिती सांगितली जात नाही. त्यामुळे बुमराह कधी याचे उत्तर माध्यमांसमोर फक्त लक्ष्मण हेच देऊ शकतात.
बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आशिया चषक व टी20 विश्वचषक या महत्त्वाच्या स्पर्धा तो खेळू शकला नव्हता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत तसेच वनडे मालिकेतही तो सहभागी झाला नाही. भारतीय संघासाठी बुमराह विश्वचषकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. भारतात चालू वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषक खेळला जाईल. या विश्वचषकात तो भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल.
(Only VVS Laxman And Physio Take Update Of Jasprit Bumrah Recovery And Comeback)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटमध्ये राजकारण! सूर्याच्या फ्लॉप शोमुळे काँग्रेस नेत्याचा बीसीसीआयवर निशाणा, सॅमसनला मिळाला सपोर्ट
वनडेतील 265 डावांनंतरही चमकतोय ‘किंग’ कोहली, पठ्ठ्याची सरासरी आहे सचिन अन् धोनीपेक्षाही जास्त; वाचाच