इंडियन प्रीमिअर लीग 2023मध्ये गुजरात टायटन्स संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने 7 सामन्यात 3 अर्धशतके झळकावली आहेत. दुसरीकडे, शनिवारी (दि. 29 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या 39व्या सामन्यात गिलला त्याचे हंगामातील चौथे अर्धशतक पूर्ण करताना अपयश आले. त्याच्या डावादरम्यान केकेआर संघाचा कर्णधार नितीश राणा यासोबत तो भिडताना दिसला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
शुबमन गिल आणि नितीश राणा यांच्यात बाचाबाची
ही घटना हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाच्या डावातील तिसऱ्या षटकात घडली. कोलकाताकडून हे षटक हर्षित राणा टाकत होता. चौथ्या चेंडूवर त्याचा सामना शुबमन गिल (Shubman Gill) याच्याशी झाला. त्याने गुड लेंथ चेंडू टाकला. यावेळी चेंडू आणि बॅटची हलकी कड घेत पॅढला जाऊन लागला. यावेळी कोलकाता संघाने एलबीडब्ल्यूसाठी अपील केली. अशात पंचांनी फलंदाजाला नाबाद घोषित केले.
मात्र, कोलकाता संघ या निर्णयाशी सहमत नव्हता. त्यामुळे कर्णधार नितीश राणा (Nitish Rana) याने डीआरएस घेतला. यावेळी रिप्लेमध्ये दिसले की, चेंडू बॅटची कड घेत पॅड्सवर लागला होता. त्यामुळे गिल नाबाद राहिला. यावेळी पंचांनी नाबाद घोषित केल्यानंतर गिल आणि राणा यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसले. तो कानाच्या दिशेने इशारा करत नितीशला काहीतरी म्हणताना दिसला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
अर्धशतकाला मुकला गिल
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारिते 20 षटकात 7 विकेट्स गमावत 179 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताकडून सलामीवीर शुबमन गिल याने 35 चेंडूत 49 धावांची खेळी साकारली. त्याने या खेळीत 8 चौकारही मारले. गिलनंतर विजय शंकर (नाबाद 51) आणि डेविड मिलर (नाबाद 32) यांनी 180 धावा करत 7 विकेट्सने सामना जिंकून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुरबाजची 81 धावांची वादळी खेळी व्यर्थ, शंकर-मिलरच्या जोरावर KKRचा धुव्वा उडवत गुजरात संघ बनला ‘टॉपर’
IPLच्या 40व्या सामन्यात भिडणार DC vs SRH संघ, नाणेफेक हैदराबादच्या पारड्यात; दोन खेळाडूंचे पदार्पण






