David Warner Test Century: ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर त्याच्या निरोप कसोटी मालिकेत धमाल करत आहे. वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. पर्थ क्रिकेट स्टेडिअम येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी वॉर्नरने पाकिस्तानी गोलंदाजांचा घाम काढला. त्याने मैदानातील चारही बाजूंना फटकेबाजी करत कसोटी कारकीर्दीतील 26वे शतक झळकावले. यावेळी त्याने खास कामगिरी केली आहे.
वॉर्नरचे शतक
झाले असे की, नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी सलामीवीर डेविड वॉर्नर याने टिच्चून फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला. त्याने सुरुवातीला 41 चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. त्यानंतर वॉर्नरने डावातील 43वे षटक टाकत असलेल्या आमिर जमाल याच्या पाचव्या चेंडूवर चौकार मारत 26वे कसोटी शतक पूर्ण केले. त्याने यावेळी 125 चेंडूत 102 धावा केल्या. त्याच्या खेळीत 1 षटकार आणि 14 चौकारांचा समावेश होता.
वॉर्नरचा विक्रम
वॉर्नरने शतक झळकावताच पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याच्या शतकांचा विक्रम मोडित काढला. त्याने 120 कसोटी सामन्यात 25 शतके झळकावली होती. तसेच, आता वॉर्नरने त्याच्या 110 कसोटी सामन्यात 26 शतके झळकावण्याचा विक्रम केला. वॉर्नरने यादरम्यान सर गॅरी सोबर्स यांचीही बरोबरी केली, ज्यांच्या नावावर कसोटीत 26 शतकांची नोंद आहे. सोबर्स यांनी 93 कसोटी सामन्यात 26 शतके केली होती. आता वॉर्नरच्या निशाण्यावर त्याच्याच देशाचे महान खेळाडू ऍलन बॉर्डर यांचा विक्रम आहे. त्यांनी 156 कसोटीत 27 शतके झळकावली आहेत.
वर्तमानातील सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके कोणाची?
सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याचा विक्रम विराट कोहली याच्या नावावर आहे. विराटच्या नावावर 80 शतके आहेत. तसेच, वॉर्नर दुसऱ्या स्थानी असून त्याच्या नावावर 49 शतके झाली आहेत. तसेच, जो रूट 46 शतकांसह तिसऱ्या स्थानी, तर रोहित शर्मा 45 शतकांसह चौथ्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त 44 शतकांसह स्टीव्ह स्मिथ पाचव्या स्थानी आहे.
Most centuries by active players:
Virat Kohli – 80.
David Warner – 49*.
Joe Root – 46.
Rohit Sharma – 45.
Steve Smith – 44.
Kane Williamson – 42. pic.twitter.com/cT6hndbCJC— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 14, 2023
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे सक्रिय खेळाडू
विराट कोहली- 80
डेविड वॉर्नर- 49*
जो रूट- 46
रोहित शर्मा- 45
स्टीव्ह स्मिथ- 44
वॉर्नरची अखेरची कसोटी मालिका
डेविड वॉर्नर त्याच्या कारकीर्दीतील अखेरची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना तो त्याच्या घरच्या मैदानात म्हणजेच सिडनीत खेळेल. यानंतर तो कसोटी क्रिकेटला रामराम ठोकेल. वॉर्नरने ही कसोटी मालिका त्याच्या कसोटी कारकीर्दीतील अखेरची मालिका असल्याचे आधीच घोषित केले होते. (opener david warner hits 26 test hundred this records made aus vs pak 1st test)
हेही वाचा-
धक्कादायक! किडनीच्या ‘या’ गंभीर आजाराचा सामना करतोय Cameron Green, 12 वर्षांपेक्षा जास्त…
एकच मारला पण सॉलिड मारला! आफ्रिदीच्या चेंडूवर वॉर्नरने बसून ठोकला अफलातून षटकार, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्