रविवारी(18 जुलै) भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना खेळण्यात आला. या सामन्यांमध्ये भारतीय संघाने श्रीलंका संघावर सात विकेटने विजय मिळवला. याचदरम्यान सलामीला म्हणून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ मैदानात उतरले होते. या दोघांनीही चांगली कामगिरी केली. आता भारताच्या सलामीवीरांबद्दल श्रीलंका संघाचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुरलीधरन प्रतिक्रिया देत म्हणाला की, असे वाटते की शिखर धवनसह पृथ्वी शॉने सलामी येणे ही भारताची एक आदर्श चाल आहे, कारण हे सलामीवीर फलंदाज विरोधी संघासाठी धोकादायक ठरू शकतात.
पृथ्वी आणि शिखर धवन इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाकडूनही सलामीची जोडी म्हणून एकत्र मैदानात उतरतात. दिग्गज फिरकीपटू मुरलीधरनला विश्वास आहे की, हे खेळाडू सहज पुढे जाऊ शकतात विशेष म्हणजे पृथ्वी शॉ.
मुरलीधरन यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना सांगितले की, “पृथ्वी शॉ हा कसोटी खेळाडूंच्या तुलनेत तो एक उत्कृष्ट एकदिवसीय आणि टी20 खेळाडू आहे, कारण तो ज्या प्रकारे खेळतो, तो मला वीरेंद्र सेहवागची आठवण करून देत असतो. तो खूप जोखीम घेऊन आणि गोलंदाजावर दबाव टाकत खेळतो. जर त्याने सामन्यात जास्त धावा केल्या, तर भारतीय संघाजवळ जिंकण्याचे मार्ग असतात. कारण तो कमी वेळात जास्त धावा करतो. त्याच्याकडे प्रतिभा आहे आणि तो निर्भय आहे. त्याला बाद होण्याची भीती नाही.”
मुरलीधरन पुढे म्हणाले की, “भारताने त्याला असे खेळण्यास प्रोत्साहित केले पाहिजे, कारण तुम्हाला सामना जिंकवणाऱ्या खेळाडूची गरज असते. तो खूप धोकादायक असेल. शिखर संयमाने खेळत असतो. मी शिखरला चांगला ओळखतो तो सनरायझर्स संघाबरोबर होता आणि तो एक उत्कृष्ट प्रदर्शन करणारा खेळाडू आहे. तो संयमाने खेळत पुढे जाऊ शकतो आणि जर पृथ्वीने टिकून खेळले तर तो गोलंदाजीसाठी धोकादायक ठरु शकतो. हा भारतासाठी मोठा फायदा आहे.”
श्रीलंकाविरुद्ध पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 263 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शॉने 43 धावांची तर शिखरने नाबाद 86 धावांची खेळी केली होती. तसेच इशान किशनने 59 धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: विश्वचषक १९८३ स्पर्धेतील दुर्लक्षित नायक, ज्याने कैफ, युवराजलाही दिले होते प्रशिक्षण
सामना जिंकला पाकिस्ताननं, अन् सेलिब्रेशन ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचं; एकदा पाहाच हा भन्नाट व्हिडिओ