बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात 3 सामन्यांची वनडे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (दि. 08 जुलै) चितगाव येथे खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने दमदार सुरुवात केली. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर सलामी जोडी असा विक्रम करणारी पहिली जोडी बनली. चला तर, त्यांच्या विक्रमाबद्दल जाणून घेऊयात…
या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, अफगाणिस्तान संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बांगलादेशचा हा निर्णय चुकीचा ठरवत अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 331 धावांचा पाऊस पाडला. या धावांमध्ये सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम जादरान (Rahmanullah Gurbaz and Ibrahim Zadran) यांच्या 256 धावांच्या भागीदारीचा सिंहाचा वाटा होता. या भल्यामोठ्या भागीदारीमुळे त्यांच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.
गुरबाज आणि इब्राहिमने रचला इतिहास
झाले असे की, अफगाणिस्तान वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम या सामन्यापूर्वी मोहम्मद शाहजाद आआणि करीम सदीक यांच्या नावावर होता. या दोघांनी स्कॉटलंडविरुद्ध 218 धावांची भागीदारी केली होती. मात्र, बांगलादेशविरुद्ध शनिवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम जादरान यांच्या भागीदारीने सर्व विक्रम मोडीत काढले. तसेच, 256 धावांच्या भागीदारीसह दोघेही यादीत अव्वलस्थानी विराजमान झाले. खरं तर, ही अफगाणिस्तानसाठी वनडेतील तिसरा द्विशतकीय भागीदारीदेखील आहे.
INNINGS BREAK! ????#AfghanAtalan put on an incredible batting performance as they made 331/9 in the 1st inning. @RGurbaz_21 (145) & @IZadran18 (100) scored ????s, making it the 1st instance that both the openers score ????s in ODIs for ????????.
Over to our bowlers now!#BANvAFG | #XBull pic.twitter.com/cQ6z166Eie
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) July 8, 2023
अफगाणिस्तानसाठी सर्वोच्च भागीदारी
256 धावा- रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम जादरान*
218 धावा- मोहम्मद शाहजाद आणि करीम सदीक
205 धावा- नूर अली जादरान आणि मोहम्मद शाहजाद
195 धावा- रहमत शाह आणि इब्राहिम जादरान
184 धावा- रहमत शाह आणि हस्तमुल्लाह शाह
गुरबाज- जादरानचे शतक
रहमानुल्लाह गुरबाज याने या सामन्यात 125 चेंडूत 145 धावांची शतकी खेळी साकारली. या धावा करताना त्याने 8 षटकार आणि 13 चौकारांचाही पाऊस पाडला. हे त्याचे वनडे कारकीर्दीतील चौथे शतक होते. त्याच्याव्यतिरिक्त इब्राहिम जादरान यानेही 119 चेंडूंचा सामना करताना 100 धावा करून शतक साजरे केले. शतक करताना त्याने 1 षटकार आणि 9 चौकारांचा पाऊस पाडला. या दोघांच्या शतकाच्या जोरावर अफगाणिस्तान संघाला वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारण्यात यश आले. (opening batters rahmanullah gurbaz and ibrahim zadran registers highest odi partnership for afghanistan in odi ban vs afg)
महत्वाच्या बातम्या-
धोनीचा बर्थडे सेलिब्रेशनचा ‘माही वे’! आपल्या लाडक्या श्वानांसह साजरा केला वाढदिवस, पाहा क्युट व्हिडिओ
विश्वचषकापूर्वी OYO कंपनीने उचलले मोठे पाऊल, 10 शहरांमध्ये वाढवणार तब्बल ‘एवढे’ हॉटेल्स