वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी क्रिकेटप्रेमी प्रचंड उत्सुक आहेत. 10 संघांचा सहभाग, 45 दिवसात 48 सामने खेळले जाणाऱ्या या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड संघ आमने-सामने असणार आहेत. मात्र, आतापर्यंत खेळल्या गेलेल्या प्रत्येक वनडे विश्वचषकाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात कोणता संघ विजयी झाला होता? असा प्रश्न विचारला, तर कदाचित अनेकांना याचे उत्तर देणे कठीण जाईल. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी आपण या लेखातून प्रत्येक वनडे विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात कोण आमने-सामने होतं आणि कुणी विजय मिळवला होता, हे पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूयात…
विश्वचषकाच्या प्रत्येक हंगामातील पहिला सामना
तसं पाहिलं, तर वनडे विश्वचषक (World Cup) स्पर्धेचा इतिहास 48 वर्षे जुना आहे. यंदा विश्वचषकाचा 13वा हंगाम आहे. सर्वात पहिला वनडे विश्वचषक 1975मध्ये खेळला गेला होता. या विश्वचषकातील पहिला सामना 7 जून रोजी लॉर्ड्स येथे इंग्लंड विरुद्ध भारत संघात खेळला गेला होता. या सामन्यात इंग्लंड संघाने 202 धावांनी मोठा विजय मिळवला होता.
यानंतर 1979 विश्वचषकातील पहिला सामना वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात बर्मिंघम येथे खेळला गेला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने 9 विकेट्सने विजय मिळवला होता. 1983च्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड आमने-सामने होते. द ओव्हल मैदानावरील या सामन्यात इंग्लंडचा 106 धावांनी विजय झाला होता. 1987च्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघ भिडले होते. हैदराबादमध्ये (सिंध) खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला 15 धावांनी पराभूत केले होते. तसेच, 1992च्या विश्वचषकातील पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऑकलंड येथे खेळला गेला होता. या सामन्यात न्यूझीलंडचा 37 धावांनी विजय झाला होता.
पुढे 1996च्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना इंग्लंडशी अहमदाबाद येथे झाला होता. हा सामना न्यूझीलंडने 11 धावांनी जिंकला होता. 1999च्या विश्वचषकातील पहिला सामना इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात लॉर्ड्स येथे खेळला गेला होता. हा सामना इंग्लंडने 8 विकेट्सने जिंकला होता. 2003च्या विश्वचषकात वेस्ट इंडिज संघाने दक्षिण आफ्रिकेचा सामना केला होता. केप टाऊनमधील या सामन्यात विंडीजने 3 धावांनी नजीकचा विजय मिळवला होता. पुढे 2007मध्येही पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघ पाकिस्तानविरुद्ध भिडला होता. किंग्स्टन येथील या सामन्यात वेस्ट इंडिजचा 54 धावांनी विजय झाला होता.
यानंतर 2011च्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारत विरुद्ध बांगलादेश संघ आमने-सामने होते. हा सामना मीरपूर येथे खेळला गेला होता. या सामन्यात भारताने 87 धावांनी विजय मिळवला होता. पुढे 2015च्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा सामना केला होता. ख्राईस्टचर्च येथील या सामन्यात न्यूझीलंडचा 98 धावांनी विजय झाला होता. त्यानंतर गतहंगामात म्हणजेच 2019 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमने-सामने होते. द ओव्हल मैदानात पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंड 104 धावांनी विजयी झाला होता.
Opening match of each ODI World Cup:
1975 – Eng v Ind, Lord’s – Eng won by 202 runs
1979 – WI v Ind, Birmingham – WI won by 9 wkts
1983 – Eng v NZ, The Oval – Eng won by 106 runs
1987 – Pak v SL, Hyd (Sind) – Pak won by 15 runs
1992 – NZ v Aus, Auckland – NZ won by 37…
— Bharath Seervi (@SeerviBharath) October 1, 2023
अशात 2023 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पुन्हा एकदा इंग्लंड असून त्यांचा सामना न्यूझीलंडशी अहमदाबाद येथे होणार आहे. या सामन्यात कोण विजय मिळवेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Opening match of each ODI World Cup see list here)
प्रत्येक वनडे विश्वचषकाच्या हंगामातील पहिला सामना
1975 – इंग्लंड विरुद्ध भारत, लॉर्ड्स- इंग्लंडचा 202 धावांनी विजय
1979 – वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, बर्मिंघम- वेस्ट इंडिजचा 9 विकेट्सने विजय
1983 – इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, द ओव्हल- इंग्लंडचा 106 धावांनी विजय
1987 – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, हैदराबाद (सिंध)- पाकिस्तानचा 15 धावांनी विजय
1992 – न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऑकलंड- न्यूझीलंडचा 37 धावांनी विजय
1996 – न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, अहमदाबाद- न्यूझीलंडचा 11 धावांनी विजय
1999 – इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, लॉर्ड्स- इंग्लंडचा 8 विकेट्सने विजय
2003 – वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केपटाऊन- वेस्ट इंडिजचा 3 धावांनी विजय
2007 – वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान, किंग्स्टन- वेस्ट इंडिजचा 54 धावांनी विजय
2011 – भारत विरुद्ध बांगलादेश, मीरपूर- भारताचा 87 धावांनी विजय
2015 – न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, ख्राईस्टचर्च- न्यूझीलंडचा 98 धावांनी विजय
2019 – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, द ओव्हल- इंग्लंडचा 104 धावांनी विजय
2023 – इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, अहमदाबाद- विजेता?*
हेही वाचा-
अश्विनच्या ‘डुप्लिकेट’ने धुडकावून लावली ऑस्ट्रेलियाची ऑफर, वर्ल्डकपमध्ये मदत करण्यास दिला नकार
World Cupपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची केरळस्थित जगातील सर्वात श्रीमंत मंदिराला भेट, फोटो व्हायरल