इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ स्पर्धेची सांगता झाल्यानंतर आता सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यावर लागले आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमीसह रोहित शर्माला विश्रांती दिल्याने भारतीय संघातून सलामीवीर म्हणून फलंदाजीसाठी कोण येणार याची चर्चा सुरू आहे. आता या चर्चांना पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. कारण, कर्णधार केएल राहुल याच्यासोबत ईशान किशन सलामीवीर म्हणून खेळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
केएल राहुल (KL Rahul) याच्यासोबत मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या ईशान किशन (Ishan Kishan) याला राहुलचा सलामीचा जोडीदार बनवण्याची मागणी होत आहे. या मालिकेत राहुलसोबत ईशान सलामीचा जोडीदार म्हणून दिसू शकतो. अशा स्थितीत उजव्या हाताच्या आणि डावखुऱ्या फलंदाजांचे संयोजन समोरच्या संघासाठी अडचणीचे ठरू शकते. फलंदाजीसोबतच ईशान चांगला यष्टीरक्षकही आहे. त्यामुळे ईशानला पहिल्या सामन्यात तरी संधी मिळण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्षी आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू म्हणून ईशान किशनला मुंबई इंडियन्सने खरेदी केले. मात्र, तो संघासाठी विशेष काही करू शकला नाही, पण ईशान हा वेगवान फलंदाज आहे. तो काही वेळात संपूर्ण डाव बदलू शकतो. ईशान आफ्रिकन गोलंदाजांना सहज अडचणीत आणू शकतो. त्यामुळे ईशान जर तडफदार अंदाजात खेळला, तर केएल राहुल संयमी खेळी करू शकेल, ज्याचा फायदा भारतीय संघाला निश्चितपणे होईल.
दरम्यान, येत्या ९ जूनपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात ५ टी२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी केएल राहुल कर्णधार, तर रिषभ पंत (Rishabh Pant) उपकर्णधार असेल. शिवाय उमरान मलिक (Umran Malik), अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांसारख्या खेळाडूंना भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याला पुनरागमणाची संधी उपलब्ध आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
INDvsSA। आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर फळफळले मिलरचे नशीब; दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने आखला प्लॅन
IPL 2022| जडेजाची १ विकेट ३.२ कोटीला, तर चौधरीने करून दिले पैसे वसूल, पाहा महागडे आणि स्वस्त गोलंदाज
वेस्ट इंडिजचा दिग्गज काळाच्या पडद्याआड, भारताविरुद्ध एका कसोटी डावात घेतल्या होत्या ५ विकेट्स