पुणे, २० मार्च २०२४ – रिअल इस्टेट डेव्हलपरमधील एक अग्रगण्य कंपनी असलेल्या एएनपी कॉर्पच्या वतीने ७ एप्रिल २०२४ रोजी वंचित समुदायाच्या समर्थनार्थ ‘एएनपी रन पुणे रन’ अर्धमॅरेथॉनचे आयोजन केले आहे. पुढील महिन्यात ७ एप्रिल २०२४ रोजी ही स्पर्धा पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी परिसरातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर पार पडणार आहे.
धर्मादायाच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारी ही शर्यत रनबडीजच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहे. वंचित समुदायातील लोकांना आरोग्य सेवेमध्ये महत्वपूर्ण मदत करताना त्यांच्या निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीसाठी होणाऱ्या प्रत्येक नोंदणी शुल्काचा उपयोग हा एएनपी केअर फाऊंडेशनच्या वतीने अशा वंचित समुदायासाठी वापरला जाईल.
एएनपी कॉर्पचे संचालक ऋषी अडवाणी म्हणाले, सामाजिक जबाबदारीचे भान कंपनीने कायम राखले आहे. एएनपी कॉर्पमार्फत आम्ही अशा वंचित समुदायातील व्यक्तींवर मूर्त प्रभाव पाडण्यासाठी वचनबद्ध आहोत. याचेच प्रतिबिंब ‘एएनपी रन पुणे रन’ या अर्ध मॅरेथॉन शर्यतीच्या आयोजनातून दिसून येते. एएनपी केअर फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूना आवश्यक सेवा देण्याचे आमचे ध्येय्य आहे.
एएनपी कॉर्पचे संचालक सौरभ अडवाणी म्हणाले, शारीरिक क्रियाकलापांच्या पलिकडे असलेल्या या उपक्रमाचे नेतृत्व करताना आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या सामाजिक कल्याण आणि सर्वसमावेशकतेसाठी आयोजित करण्यात आलेली ‘एएनपी रन पुणे रन’ हाफ मॅरेथॉन आमच्या वचनबद्धतेचे उदाहरण देते. आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी या शर्यतीचे आयोजन म्हणजे आम्ही उचललेले पुढचे पाऊल म्हणता येईल.
एएनपी कॉर्पचे संचालक श्री, तनुज फेरवानी म्हणाले, आम्ही या शर्यतीचे आयोजन करताना सर्वसमावेशक स्वरुपावर भर दिला आहे. ‘एएनपी रन पुणे रन’ अर्ध मॅरेथॉन विविध पार्श्वभूमीतील सहभागींचे स्वागत करते. तुम्ही अनुभवी धावपटू असाल किंवा एखाद्या उदात्त हेतूला पाठिंबा देऊ इच्छित असाल अशा प्रत्येकाचे शर्यतीत स्वागत आहे. एकत्र मिळून काम केल्यास आपण गरजूंच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवू शकतो.
या उपक्रमातंर्गत २१ कि.मी. अर्ध मॅरेथॉन, १० कि.मी., ५ कि.मी. फन रन, ३ कि.मी. फन रन आणि वॉक अशा विविध शर्यती होणार आहेत. सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला टी-शर्ट, पदक, गुडी बॅग, टायमिंग चिप, नाश्ता, हायड्रेशन, रुट सपोर्ट आणि ई-प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक साहित्य पुरवले जाणार आहे. (Organized by ANP Corp. ‘ANP Run Pune Run’ charity half marathon race)
महत्वाच्या बातम्या –
सूर्यकुमार यादव पहिला सामना खेळला नाही तर कशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11? जाणून घ्या
जेष्ठ राष्ट्रीय खेळाडू वसंत ढवण यांचे वृद्धापकाळाने निधन