मुंबई । जपानची २२ वर्षीय महिला कुस्तीपटू हाना किमुरा हिचे निधन झाले आहे. हानाचा घरातच संशयास्पद मृतदेह घरातच आढळून आला. ती नेटफ्लिक्सच्या रिअॅलिटी शो टेरेस हाऊस या नव्या सिरिजमध्ये देखील काम करत होती. हानीच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आले नाही.
याबाबत जपानी प्रसिद्धी माध्यमांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोशल मीडियावर हानाला अनेक जीवे मारण्याच्या धमकी मिळत होत्या. नेटफ्लिक्सच्या टेरेस हाऊस या रिअॅलिटी शोमधील भूमिकेमुळे तिला धमकी मिळत होत्या. या शोमध्ये टोक्योमध्ये तीन पुरुष आणि तीन महिला एकत्रितपणे एकाच घरात राहत होत्या. नुकतेच कोरोना व्हायरसमुळे हा शो अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला.
या घटनेच्या पूर्वी एक दिवस अगोदर शुक्रवारी इन्स्टाग्रामवर हानीने मांजरा सोबतचा एक फोटो शेअर केला होता. पोस्टमध्ये लिहले होते की, गुड बाय! मी तुझ्यावरती खूप प्रेम करते. तुला दीर्घायुष्य आनंद लाभो. मला माफ कर. हानीची आई देखील प्रसिद्धी महिला कुस्तीपटू होती.